आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीत जायचे की नाही हे सर्वांच्या ऑफर्स बघून ठरवेन- उद्धव ठाकरेंची गुगली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला भाजपविरोधी महाआघाडीत सामील होण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच गुगली टाकून बुचकाळ्यात पाडले. महाआघाडीत सामील होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर, 'सर्वांच्या ऑफर बघून निर्णय घेऊ' असा मोघम उत्तर देऊन संदिग्धता कायम ठेवली. ऑफर बघून ठरवू असे सांगून उद्धव ठाकरे यांनी भाजपलाही गॅसवर ठेवले आहे. 

 

दरम्यान, शिवसेनेची हिंदुत्त्ववादी ओळख असून, जातीयवादी पक्षांसोबत काँग्रेस कदापी जाणार नाही व काँग्रेस आघाडीत त्यांना घेतले जाणार नाही असे दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी म्हटले होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही शिवसेनेसोबतची महाआघाडीची चर्चा फेटाळून लावली होती. मात्र, केवळ भाजप विरोध म्हणून शिवसेना विरोधकांच्या कळपात जाऊ शकते का? याची चर्चा रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे भाजपविरोधात न बोलता मोदी हटाव नारा देऊन महाआघाडीशी जवळिक साधू शकतात किंवा छुपी आघाडी करू शकतात, असे बोलले जात आहे. 

 

राजकीय वर्तूळात अशी ही चर्चा आहे की, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आदी पक्ष प्रत्येकी 16-16 जागा आपसात वाटून घेतील व आपापल्या जागांवरच तगडे उमेदवार देतील. त्यातूनच हे तीन मोठे पक्ष गरजेनुसार राजू शेट्टी, बहुजन विकास आघाडी, प्रकाश आंबेडकर, शेकाप, राजेंद्र गवई आदी छोट्या-मोठ्या पक्षांना महाआघाडीत सामावून घेत काही जागा सोडतील. काँग्रेस- राष्ट्रवादीची इतर समविचारी पक्षांनी अधिकृत आघाडी होईल तर ही आघाडी शिवसेनेच्या (निवडून येणा-या हा निकष) 15-16 जागांवर कमकुवत उमेदवार देऊन शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत करतील. तर शिवसेना उर्वरित 32-33 ठिकाणी भाजपला अडचणीत आणण्यासाठी महाआघाडीला मदत करेल. 

 

भाजपविरोधी आघाडीची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवारांनी पावले टाकली आहेत. त्याचाच भाग म्हणून शिवसेनेलाही पवारांनी रविवारी पक्षाच्या मेळाव्यात भाजपविरोधात एकत्र येण्यासाठी अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. सोबतच देशातील सर्व प्रादेशिक पक्षाच्या नेत्याच्या ते सातत्याने संपर्कात आहेत. त्याचसोबत काँग्रेसने काय व कशी पावले टाकावीत यासाठीही ते राहुल गांधी यांना मार्गदर्शन करताना दिसत आहे. अशावेळी सर्वमान्य म्हणून उमेदवार म्हणून पवारांकडेही महाआघाडीचे नेतृत्त्व येऊ शकते. अशा स्थितीत शिवसेना पवारांना मराठीच्या मुद्यांवर पंतप्रधानपदाला पाठिंबा देऊ शकते हे गृहित धरून पवारच शिवसेनेसोबत छुपा समझोता करतील व त्यांच्या किमान 15 जागांवर तगडे उमेदवार देऊन ते विजयी कसे होतील याचे गणित मांडतील. दुसरीकडे, उर्वरित 32-33 जागांवर छोट्या-मोठ्या पक्षांना महाआघाडीत सामील करून मतांचे विभाजन होणार नाही याची काळजी घेतील,अशी चर्चा आहे. राजू शेट्टीसाठी हतगंणगलेची जागा, हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी पालघरची जागा, प्रकाश आंबेडकर व राजेंद्र गवई यांच्या करिता अकोला, अमरावतीची जागा देऊन छोट्या पक्षाचे समाधान करू शकतात अशीही चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...