आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत महिलेचा \'शोले\'स्टाईल ड्रामा, सुरक्षायंत्रणांची तासभर चांगलीच उडाली तारांबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत एका महिलेने शोलेतील वीरू स्टाईल आंदोलन करत आज दुपारी मुंबईतील चर्नी रोडवर चांगलाच ड्रामा केला. सगळे पोलिस चोर आहेत, मला न्याय मिळत नाहीये असे सांगत ही महिला चर्नी रोड रेल्वे स्थानकाबाहेरील एका भल्या मोठ्या होर्डिंगवर चढली. बघता बघता तिथे बघ्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे या लेडी वीरूला चांगला चेव आला.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. मात्र, महिला ऐकण्याची मनस्थितीत नव्हती. उलट ती वरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली. यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सीडीने तिला तासाभराने कसे-बसे उतरवण्यात यश आले.

 

या महिलेला होर्डिंगवरून उतरावायला गेलेल्या एका पोलिसाला तिने वरूनच लाथा घातल्या. तुम्ही लोक (पोलिस) सगळे चोर आहात, मला न्याय हवा आहे अशी ती बडबड करत होती. मात्र, तिच्यावर कोणी अन्याय केला, तिला कोणाकडून न्याय हवा आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...