आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV सुध्दा नाही पकडु शकला नव्हता या चोरटीला; मग अशा रितीने करण्यात आले जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉकेट खरेदी करण्याच्या बहाण्याने ही महिला दुकानात शिरली. त्यानंतर दुकानादाराचे लक्ष इतरत्र वळवत तिने चोरी केली. - Divya Marathi
लॉकेट खरेदी करण्याच्या बहाण्याने ही महिला दुकानात शिरली. त्यानंतर दुकानादाराचे लक्ष इतरत्र वळवत तिने चोरी केली.

मुंबई- कल्याण येथे पोलिसांनी एका चोरी कऱणाऱ्या तरुणीला अटक केली आहे. सीसीटीव्हीला गुंगारा देत ही तरुणी दागिन्यांची चोरी करत होती. तिच्याकडुन लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे नाव क्रिस्टीना जोसफ असे आहे. तिला कल्याणमधील एका दागिन्यांच्या दुकानात चोरी करताना पकडण्यात आले. या महिलेचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

 

काय आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये
- सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला कल्याणमधील विजयनगर येथील एक दागिन्याच्या दुकानात आलेली दिसत आहे. या महिलेला एक लॉकेट हवे असल्याचे ती सांगत आहे. 

- दुकानदारासोबत ती लॉकेटच्या दराबद्दल घासाघीस करत आहे. काही वेळानंतर ती काहीच खरेदी न करता तेथून जाताना दिसत आहे. तिला जाताना पाहून दुकानदार दागिन्याचा बॉक्स पाहतो तर त्यातील लॉकेट गायब असते.

- त्यानंतर दुकानदार क्रिस्टीनाला थांबवत तिची तपासणी करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा क्रिस्टीना त्याला विरोध करते. प्रकरण वाढत असल्याचे पाहून दुकानदार पोलिसांना बोलवतो. त्यानंतर पोलिस तिची तपासणी करतात तिच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये लॉकेट सापडते.

- क्रिस्टीनाला अटक करण्यात आली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद होऊ शकली नाही. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...