आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील डॉक्टरांची कमाल: दुर्मिळ शस्त्रक्रिया करत काढला तब्बल दोन किलोचा ब्रेन ट्यमूर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशात राहणा-या संतलालचे डोकं दिवसेंदिवस मोठं होत चालले होते. - Divya Marathi
उत्तर प्रदेशात राहणा-या संतलालचे डोकं दिवसेंदिवस मोठं होत चालले होते.

मुंबई- मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आतापर्यंतचा सर्वात मोठी ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉक्टरांनी 31 वर्षीय कपडे विक्रेत्याच्या डोक्यातून 1.873 किलो ग्रॅम वजनाचा ट्यूमर काढला. डॉक्टर्सनी याला जगातील सर्वात मोठी ब्रेन ट्यूमर सर्जरी म्हटले आहे. या सर्जरीनंतर पेशंट एकदम फिट आहे व काही दिवसातच तो आपल्या घरी जाणार आहे. या तरूणाचे डोके पाहून लोक त्याला दोन डोक्याचा म्हणायचे. असा काढला ट्यूमर...

 

- नायर हॉस्पिटलमधील डॉक्टर्सच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील संतलाल पाल नावाचा तरूण उपचारासाठी मुंबईत पोहचला होता. त्याचे डोके एवढे मोठे झाले होते की पाहणा-याला वाटायचे तो दोन डोकी घेऊन हिंडत आहे.
- डॉक्टरांच्या माहितीनुसार, संतलालवर उपचार करणे सोपे नव्हते. पाहता पाहता 6 महिन्यात हा ट्यूमर पहिल्यापेक्षा डबल म्हणजे 1.8 किलो वजनाचा झाला.  
- उपचार करणारे डॉक्टर त्रिमूत्री नाडकर्णी यांनी सांगितले की, "संतलालवर उपचार करणे सोपे नव्हते. ट्यूमर वाढत चालला होता आणि अशात ऑपरेशन करणे खूपच जोखमीचे होते. डॉक्टर सर्व प्रकारे सावधानता बाळगत होते. सर्वात पहिले डॉक्टरांनी ब्रेनचे CT स्कॅन आणि MR स्कॅन्स केले. सर्व रिपोर्ट्स पाहिल्यानंतर संतलालचे 14 फेब्रुवारी रोजी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला गेला."

 

7 तास चालले ऑपरेशन-

 

- या ऑपरेशनमध्ये डॉ. त्रिमूत्री नाडकर्णी आणि त्यांच्या टीमला सुमारे 7 तास वेळ लागला. 
- संतलालचे ऑपरेशन सुमारे 11 यूनिट रक्ताचा वापर करण्यात आला.
- याआधी केईएम हॉस्पिटलमध्ये एका पेशंटच्या डोक्यातून 1.4 किलोचा ट्यूमर काढला गेला होता.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, संतलाल पालचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...