आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

की-बोर्डवर ABCD एका क्रमात का नसते, काय आहे या मागचे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कधी तुम्ही विचार केला आहे की, की-बोर्डचे बटण एका क्रमात का नसते. की-बोर्डची सुरुवात Q,W,E,R,T ने का होते. की-बोर्डमधील F आणि J या बटनांवर उभार का असतो. जर तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला या बाबतची माहिती देणार आहोत.

 


सगळ्यात जास्त वापरात येणारे बटन

 

पहिली एक क्रमात होती ही बटने
- की-बोर्डला टाईप रायटरवरुन बनविण्यात आले आहे. 1868 मध्ये क्रिस्टोफर लैथम शोल्सने पहिल्यांदा टाईपरायटर बनवला. ज्यात शॉल्सने बटनाला एका अल्फाबेटिकल क्रमात ठेवले होते. पण ही बटणे अल्फाबेटिकल क्रमात ठेवल्याने काही अडचणी येऊ लागल्या. टाईप करताना अनेकदा बटण जॅम होत होते.
- बटणे क्रमात असल्याने ती त्रासदायक ठरत होती. या मुळे टायपिंगमध्ये चुकाही होत होत्या.
- 1873 मध्ये शॉल्सने नव्या पध्दतीने टाईपरायटरवर बटणे बसवली. त्यात त्याने सगळ्यात जास्त वापरात येणाऱ्या अक्षरांचा क्रम बदलला होता. सगळ्यात जास्त वापर होणारी बटणे यात जवळ ठेवण्यात आली होती. त्यानंतर की-बोर्ड एका नव्या फॉम्रॅटमध्ये समोर आला. त्यात  Q,W,E,R,T,Y अक्षरे पहिल्या रांगेत होती. त्यामुळे या की-बोर्डला क्वेर्टी असे म्हटले जात होते.

शॉल्स यांच्या क्वेर्टी मॉडेलला नंतर रिमिंग्टन आणि सन्सने खरेदी केले. त्यानंतर 1874 मध्ये रिमिंग्टनने बाजारात अनेक की-बोर्ड आणले.

 

 

एफ आणि जे बटनाचे वैशिष्टय
जर तुम्ही कधी एफ आणि जे हे बटन काळजीपूर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या बटनांना काहीसा उंचवटा आहे. असे टायपिंग करणे सुलभ जावे यासाठी करण्यात आलेले आहे. जेव्हा कोणी टायपिंग शिकते तेव्हा त्या व्यक्तीची बोटे ही मध्यवर्ती रांगेत असतात. टायपिंग करताना डाव्या हाताची बोटे एफ वर तर डाव्या हाताची बोटे जे वर असतात. टाईप करताना तुमचे डोळ जरी स्क्रीनवर असले तरी या उंचवट्यामुळे तुम्हाला कळते की तुमचे बोट नेमके कुठल्या अक्षरावर अथवा बटनावर आहे. सरावामुळे आणि या उंचवट्यामुळे तुम्हाला टंकलेखन करणे सोपे जाते.

 

 

सगळ्यात जास्त वापरात येणारे बटन
की-बोर्डवर सगळ्यात जास्त वापर हा स्पेस बारचा होतो. त्यानंतर ई चा वापर होतो. असे घडते याचे कारण इंग्रजीत जास्तीत जास्त शब्दांमध्ये हे अक्षर आहे. तिसऱ्या नंबरवर बॅकस्पेस आहे. बॅकस्पेसचा वापर टायपिंगमधील चुका दुरुस्त करण्यासाठी केला जातो. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...