आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये घुसवले डोके, स्टंटमुळे जिवाला निर्माण झाला होता धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- युटयूबसाठी वेगवेगळे विनोदी व्हिडिओ बनविणाऱ्या एका व्यक्तीच्या एक स्टंट चांगलाच अंगलट आला होता. बर्मिंघम येथे राहणारी ही व्यक्ती आपल्या मित्रांसोबत मिळून हा व्हिडिओ बनवत होती. यात डोक्याच्या चारही बाजुंनी सिमेंटच्या पध्दतीचे एक मिश्रण पॉलिथिनमध्ये भरण्यात आले होते. त्याला बॉक्सचा आकार देण्यासाठी मायक्रोव्हेव ओव्हनचा वापर करण्यात येत आहे. पण स्टंट चुकीचा होतो. ओव्हनच्या आतमध्ये डोके घुसवताच सिमेंट वेगाने घट्ट होते. 

 

जीव आला होता धोक्यात
- वेगाने सिमेंट घट्ट झाल्याने या व्यक्तीचे डोके ओव्हनच्या आत फसते. त्याला श्वास घेणेही अवघड होते. अनेक प्रयत्न करुनही त्याचे मित्र त्याला बाहेर काढु शकत नाहीत.

- श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर एक पाईप त्याच्या तोंडावर लावण्यात येतो. ज्यामुळे त्याला श्वास घेता येईल. काहीच वेळात तेथे डॉक्टरांचा एक चमु येतो.

 

डॉक्टरही झाले त्रस्त
- डॉक्टरांची टीम घटनास्थळावर पोहचल्यावर तेथील दृश्य पाहून ते थक्क झाले. त्याच्यावर प्रथमोपचार केल्यावर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर त्याला कसेबसे बाहेर काढण्यात आले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...