आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभराची नोट येणार लवकरच नव्या रंगात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नाशिक- काळ्या बाजारातील बोगस नोटा बंद होण्यासाठी केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करुन त्या नव्या रंगात बाजारात आणल्या. त्यानंतर आाता शंभर रुपयांची नोटही नव्या रंगामध्ये येणार असल्याची माहिती आयएसपी व सीएनपीतील मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी दिली. नोटाबंदीनंतर अचानक   आलेल्या नोटांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी नाशिक येथे भेट दिली. तसेच करन्सी प्रिटिंग प्रेसची पाहणी केली. 

 

पासपोर्ट मशीनला मंजुरी-

 

नाशिकरोड इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये पासपोर्ट तयार करण्यात येतात. यासाठी केंद्राने पासपोर्टसाठी मशीनला मंजुरी दिली असून त्यासोबतच इन ले या मशिनला देखील मंजुरी देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...