आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात आता 132 पोलिस ठाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृह विभागाने राज्यात १३२ पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भातील एक परिपत्रक गृह विभागाने नुकतेच जारी केले आहे. या पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रँचायझी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरीसंदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल.   


साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येतील, तर मोठ्या शहरांमध्ये ५ पोलिस ठाण्यांना वीजचोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणची ६ पोलिस ठाणी बंद करण्यात आली अाहेत. वीजचोरीच्या माध्यमातून सुमारे १० टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात ४ पोलिस ठाणी, औरंगाबाद जिल्ह्यात ५, बीड जिल्ह्यात ४, ठाणे जिल्ह्यात १०, धुळे जिल्ह्यात ३,  हिंगोलीत ३, नांदेड जिल्ह्यात ४, नाशिक जिल्ह्यात ५, जालन्यात ३, परभणी जिल्ह्यात ३, उस्मानाबाद ३, लातूर ३, नागपूर शहर व ग्रामीण मिळून ७ पोलिस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येईल. पुणे शहर व ग्रामीण मिळून ७ पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात ४, अकोला ३, अमरावती ४, भंडारा २, बुलडाणा २, चंद्रपूर ३, गडचिरोली २, गोंदिया जिल्ह्यात ३, जळगाव  जिल्ह्यात ४, कोल्हापूर जिल्ह्यात २, नंदूरबार ३, पालघर ६, रायगड ४, रत्नागिरी २, यवतमाळ ४, मुंबई शहर व उपनगरात ६ पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील. 

 

राज्यात तब्बल ७२७४ काेटींची थकबाकी  
वीज बिल न भरल्यामुळे राज्यातील २६ लाख ९० हजार निवासी ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यात अाला आहे, तर २ लाख ३५ हजार कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. या निवासी ग्राहकांकडे दंड व्याजाची रक्कम म्हणून २३५१ कोटी, तर कृषी ग्राहकांकडे ८८६ कोटी वीज बिलाची थकबाकी आहे. वीज बिल न भरणाऱ्या निवासी, कृषी व अन्य ग्राहकांकडे दंड व्याज धरून ७२७४ कोटींची वीज बिलाची थकबाकी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...