आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई काम सांगते तर भाऊ घराबाहेर पडू देत नाही, चिट्ठी लिहून नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे- भिवंडीत नववीच्या एका विद्यार्थिनीने आई टीव्ही पाहू न देता काम सांगते तसचे भाऊ घराबाहेर पडून देत नसल्याचा राग मनात ठेवून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील कोंबडीपाडा येथे ही घटना घडली. 

 

आई टीव्ही बघू न देता सतत काम सांगते तर भाऊ घराबाहेर जाण्यास मनाई करतो, यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख तिने सुसाईड नोटमध्ये केला आहे, अशी माहिती निजामपुरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश यादव यांनी दिली. मुलीचे वडील रोजंदारीवर काम करुन तर आई परिसरात धुणीभांडी करुन घर चालवते. तिचे दोन्ही भाऊ गोदामात कामाला जातात. ती नुकतीच आठवी पास होऊन नववीत गेली होती. घरकामात मदत करावी, असं तिचे आई-वडील तिला नेहमी सांगत असत. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...