आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका डीपीवर 2कृषिपंप, शेतकऱ्यांना दिलासा; वीज ट्रिपच्या कटकटीपासून कायमची मुक्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कृषिपंपधारक शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीकडून मोठी खुशखबर आहे. वीज जोडणीची मागणी केलेल्या २ लाख २५ हजार कृषिपंपधारक आणि लघुदाब वाहिनीवरील सध्याच्या ४० लाख ६८ हजार कृषिपंपधारकांना लवकरच हाय व्होल्टेज वीजजोडणी मिळणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीने उच्च दाब वितरण प्रणाली योजना (एचव्हीडीएस) आणली असून एका डीपीवर (रोहित्र) यापुढे दोन कृषिपंप असणार आहेत. त्यामुळे वीज ट्रिपच्या कटकटीपासून शेतकऱ्यांना कायमची मुक्ती मिळणार अाहे. महावितरणला यासाठी पाच हजार कोटींचा खर्च येणार आहे. 


राज्यात ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपधारक शेतकरी आहेत. तसेच २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी वीज जोडीसाठी पैसेही भरले आहेत. या प्रलंबित शेतकऱ्यांनाही महावितरणकडून हाय व्होल्टेज वीजजोडणी दिली जाणार आहे.  


आजपर्यंत कृषिपंपांना ६३ ते १०० केव्हीएची वीज जोड दिला जात असे. एकाच डीपीवर (रोहित्र) अनेक कृषिपंप जोडलेले असत. त्यामुळे लोड येऊन वीज ट्रिप होत असे. अनेकदा राेहित्र जळत असे. लगेच नवे राेहित्र मिळत नसे. विजेअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावे लागे. विहिरीत पाणी असूनही पिके जळून जात होती. त्यामुळे वैतागलेले काही शेतकरी आकडा टाकून वीज घेण्याचा प्रयत्न करत असत.  


नव्या उच्च दाब योजनेत (एचव्हीडीसी) या कटकटीपासून मुक्ती मिळणार आहे. एका डीपीवर (राेहित्र) दोनच कृषिपंप असतील. त्यामुळे राेहित्रावर ताण येणार नाही. तो जळणार नाही. आकडा टाकून वीज घेता येणार नाही. 

 

महावितरणला अपेक्षा 
एका डीपीवर (राेहित्र) सध्या २० ते २५ कृषिपंप अाहेत. लोड आल्याने तो अनेकदा जळतो. नवा डीपी लगेच मिळत नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांना चिरीमिरी द्यावी लागते किंवा नेत्याचा दबाव तरी आणावा लागतो. उच्च दाब योजनेत एका डीपीवर दोन कृषिपंप असतील. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये डीपीसंदर्भात स्वामित्वाची भावना निर्माण होईल, अशी महावितरणला अपेक्षा आहे. 

बातम्या आणखी आहेत...