आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरमध्‍ये Bridgeवरून कोसळली कार; दोघांचा जागीच मृत्‍यू, 3 जण गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पालघरमध्‍ये मुंबई-अहमदाबाद राष्‍ट्रीय महामार्गावरील एका पुलावरून कार कोसळल्‍याने 2 जणांचा जागीच मृत्‍यू झाला आहे. मंगळवारी संध्‍याकाळी कासा येथे ही घटना घडली. यामध्‍ये 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

 

याविषयी कासा पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी संध्‍याकाळी 6 वाजेच्‍या दरम्‍यान चारोटी पुलावर ही दुर्घटना घडली. गुजरात येथील वापी येथून ही कार नालासोपा-याकडे जात होती. कारमध्‍ये 5 जण होते. मात्र चारोटी पुलावर येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार सरळ पुलावरून खाली कोसळली. 

 

या अपघातात चालक रोहित डुबे आणि ओमप्रकाश डुबे यांचा जागीच मृत्‍यू झाला. रोहित डुबे हे भायंदर तर ओमप्रकाश डुबे सातांक्रुझचे रहिवासी होते. अपघातात इतर तीन जण सुनिल पांडे, दयाशंकर पेठ आणि संदिप उपाध्‍याय हे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्‍यांना स्‍थानिक रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 

   

बातम्या आणखी आहेत...