आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: कुर्ल्यात बेस्ट डेपोत दोन बसच्या मध्ये चिरडून बॅंकर तरूणीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बेस्टच्या कुर्ला बस डेपोमध्ये दोन बसच्या मध्ये चिरडून एका 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

 

अमरीन सबा मूर्तिजा शेख (वय 22) असे मृत तरूणीचे नाव आहे. ती वांद्रे कुर्ला संकुलातील एका बँकेत नोकरीला होती.  

 

याबाबतची माहिती अशी की, अमरीन आज सकाळी नेहमीप्रमाणे नोकरीला चालली होती. कुर्ला डेपोत ती बस पकडण्यासाठी आली होती. मात्र, त्यावेळी बेस्टच्या दोन बस एका मागोमाग लावल्या होत्या. दोन बसमध्ये जे अंतर होते त्यातून अमरीन चालली होती. त्यावेळी बसच्या चालकाने बस मागे घेतली. त्यामुळे अमरीन मागील बसमध्ये दाबली गेली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला तेथील जवळील भाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...