आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईवरील महाभयंकर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडील गमावलेला मोशे होल्त्झबर्ज तब्बल 9 वर्षांनंतर भारत भेटीला आला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्ताने मोशेही मुंबईत दाखल झाला आहे. मोशे 17 जानेवारीला इस्रायलच्या पंतप्रधानांसह मुंबईत उपस्थित राहाणार आहे. तसेच 18 जानेवारी तो, पंतप्रधान मोदी, पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबत छाबाडा हाऊसचा दौरा करणार आहे.
कमांडोंनी अशी केली धाडसी कारवाई...
26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्रीच्या सुमारास 10 पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत घुसले. नंतर त्यांनी तब्बल तीन दिवस मुंबईला वेठिस धरले होते. त्यांनी शेकडो लोकांचे बळी घेतले तर अनेकांना जखमी केले. ठिकठिकाणी गोळीबार करीत मुंबईत अगदी मृत्यूचे तांडव केले. अखेरीस कमांडो आणि पोलिसांनी दहशतवाद्यांना ठार मारले.
26/11 चा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा कमांडोंना बोलविण्यात उशीर झाला. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयाचा अभाव यावेळी दिसून आला. परंतु, कमांडोंनी हॉटेलचा ताबा घेतल्यावर सगळ्या दहशतवाद्यांना ठार मारले. कारवाई यशस्वी झाली. परंतु एनएसजीने आपले तीन जाबाज कमांडो गमावले. त्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन, हवालदार चंदर आणि हवालदार गजेंदर सिंह बिष्ट हे तिघे शहीद झाले होते.
26/11 ला जाणून घ्या कशी झाली कमांडो कारवाई, वाचा पुढील स्लाईडवर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.