आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन प्रकल्पांना मोदींची 36 हजार कोटींची मदत, मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या सिंचन प्रकल्पांसाठी ४ वर्षांत तब्बल ३६ हजार कोटींचा निधी दिला. दुष्काळात राज्याला ८ हजार कोटींची अतिरिक्त मदत केली. इतर राज्याच्या तुलनेत केंद्राचा सर्वाधिक निधी महाराष्ट्राच्या वाट्यास आला आहे. केंद्र सरकार राज्याच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले. त्यामुळे राज्याने विकासात आघाडी मिळवली,   असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.  


मोदी सरकारला चार वषॅे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अायाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.  या वेळी मुंबई भाजप अध्यक्ष अाशिष शेलार व मुख्य प्रवक्ते माधव भंडारी उपस्थित होते.  
मुख्यमंत्री म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात राज्यातले सिंचन प्रकल्प अर्धवट पडले होते. आम्ही हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले. अशा १०६ प्रकल्पांना मोदी सरकारने ३६ हजार कोटींचा निधी दिला. दुष्काळातही केंद्राने सढळ हाताने मदत केली. त्यासाठी दोन दुष्काळात राज्याला ८ हजार कोटींचा अतिरिक्त निधी दिला. केंद्राच्या मदतीने राज्यात मोठ्या संख्येने कोल्ड स्टोअरेज आणि फूड प्रोसेसिंग प्रकल्प मंजूर केले आहेत. राज्यात ५ हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते. भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील १५ हजार किमीच्या महामार्गांना मंजुरी दिली. वर्षानुवर्षे रखडलेले तीन रेल्वेमार्ग आता कार्यान्वित झाले आहेत. पीक विमा योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला होत आहे. पंतप्रधान आवास योजनेत राज्यात साडेसहा लाख घरे बांधली आहेत. 

 

इतिहासात प्रथमच कृषी उत्पादनाचा विक्रम
मुंबईची रेल्वे सेवा सुधारण्यासाठी चाळीस हजार कोटींचा निधी दिला. इंदू मिल येथे डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी मोदी यांनी ३ दिवसांत जागा दिली. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्राने सर्व परवानग्या दिल्या. मोदी सरकारच्या धडाकेबाज कामगिरीमुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कृषी उत्पादनाचा विक्रम नोंदवला गेला. भारत आता जगातील सर्वात मोठी विकसित होत असलेली अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत अाहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला.

बातम्या आणखी आहेत...