आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलिबागमध्‍ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न, कोल्ड्रिंक्समधून घेतले विष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रायगड जिल्‍ह्यातील अलिबाग येथे एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला आहे. पाचही जणांना गंभीर अवस्‍थेत अलिबाग जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. परिवाराने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न का केला, हे अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकलेले नाही.

 

दीड वर्षीय दोन मुलांची प्रकृती गंभीर
- अलिबागमधील आक्षी गावात पाटील कुटुंबीयाने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. यामध्‍ये राहुल पाटील यांचे वडील रामचंद्र पाटिल (60), आई रंजना पाटिल (50), पत्नी कविता राहुल पाटिल(25) आणि दीड वर्षांची दोन मुले स्‍वराली पाटील आणि स्‍वराज पाटील यांचा समावेश आहे. मुलांची प्रकृती अत्‍यंत गंभीर असल्‍याची माहिती आहे. राहुल पाटील हे नोकरीनिमित्‍त मुंबईला राहतात. घटनेची माहिती मिळताच त्‍यांनी अलिबागला धाव घेतली आहे.


मुलांचे ओरडणे ऐकून पोहोचले शेजारी
आज (बुधवारी) दुपारी 12 वाजण्‍याच्‍या सुमारास ही घटना घडल्‍याची माहिती आहे. पाचही जणांनी कोल्‍डड्रिंकमध्‍ये विष मिसळून आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. कोल्‍डड्रिंक पिल्‍यानंतर त्‍यांना उलटी झाली. यादरम्‍यान मुलांच्‍या ओरडण्‍याचा आवाज ऐकून शेजारी त्‍यांच्‍या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. शेजा-यांनी पाचही जणांना ताबडतोब रुग्‍णालयात दाखल केले. नंतर रुग्‍णालय प्रशासनानेच याची माहिती पोलिसांना दिली.


अंधश्रद्धेच्‍या अँगलनेही तपास
- घटनास्‍थळी पोलिसांनी भेट देऊन कोल्‍डड्रिंकच्‍या बॉटल्‍स आपल्‍या ताब्‍यात घेतल्‍या आहेत. त्‍यांची तपासणी करण्‍यात येणार आहे. हा सामूहिक आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न आहे की, यामागे एखादी अंधश्रद्धा आहे या दृष्‍टीनेही पोलिस तपास करत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...