आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: जुहू बीचवर पोहताना 5 जण बुडाले, एकाला वाचवण्‍यात यश; इतरांचा अद्यापही शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जुहू चाैपाटीवरील समुद्रात गुरुवारी सायंकाळी ५ तरुण बुडाले. समुद्राला अालेल्या भरतीमुळे पाण्याचा अंदाज न अाल्याने ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान अाणि लाइफ गार्ड यांनी तातडीने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापैकी फक्त वसीम खान (२२) या तरुणाचा जीव वाचवण्यात यश अाले. अन्य चाैघेही बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचे मृतदेह शाेधण्याचे काम काेस्ट कार्ड अाणि हेलिकाॅप्टरच्या मदतीने सुरू हाेते.


गोदरेज चौपाटी व गांधीग्राम चौपाटीच्‍या मध्‍ये असलेल्‍या जुहू बीचवर हे 5 युवक पोहण्‍यासाठी गेले होते. फरदिन सौदागर (17), सोहेल शकील खान (17), फैसल शेख (17), नाझीर गाझी (17) व वसीम सलीम खान (22) अशी युवकांची नावे आहेत. बीचवर पोहत असताना पाचही युवक पाण्‍यात बुडाले. त्‍यांच्‍यापैकी वसीम खान (22) या युवकास वाचवण्‍यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. इतरांचा शोध अद्यापही सुरू आहे. हे सर्व युवक अंधेरी, पश्चिम मुंबई येथील रहिवासी आहेत.

बातम्या आणखी आहेत...