आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 10 नगर परिषदा, नगर पंचायतींसाठी 73 टक्के मतदान; 7 ठिकाणी उद्या निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाणे जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या येणाऱ्या पाच पंचायत समित्यांसाठी सरासरी ६५ टक्के तर राज्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवारी सरासरी ७२.८१ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. राज्यातील सहा नगर परिषदा व चार नगर पंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदासाठी बुधवारी मतदान झाले.  त्याची सरासरी पुढीलप्रमाणे. हुपरी (जि. कोल्हापूर) ८५.१८ टक्के, नंदुरबार- ७०.९३ टक्के , नवापूर (जि. नंदुरबार)- ६६.३४ टक्के, किनवट (जि. नांदेड)- ७७ टक्के, चिखलदरा (जि. अमरावती)- ८०.८५ टक्के, पांढरकवडा (जि. यवतमाळ)- ६८.५६%, वाडा (जि. पालघर)- ७२.१९ %, शिंदखेडा (जि. धुळे)- ७२.५९ %, फुलंब्री (जि. औरंगाबाद)- ७५.१४ % आणि सालेकसा (जि. गोंदिया)- ८९.६५ टक्के मतदान झालेे. वाडा नगरपंचायत, नंदुरबार आणि नवापूर नगरपरिषदेची मतमोजणी १८ डिसेंबर राेजी तर अन्य सर्व नगर परिषदा व नगर पंचायतींची मतमाेजणी गुरुवारी हाेणार अाहे.

 

मुंबईत पोटनिवडणूक
बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्र. २१ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी बुधवारी २९ टक्के मतदान झाले. या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथे एकूण ३२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. येथील मतमाेजणीही गुरुवारी हाेईल. 

बातम्या आणखी आहेत...