आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; 9 महिन्याच्या चिमुकलीसह वडिलांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातात वडिलांसह 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ताजेफूड मॉलजवळ घडली. या अपघातात सुमित रोचलाणी (28) यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर 9 महिन्‍यांची चिमुकली हितीका रोचलानी हिचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मुंबईच्या दिशेने निघालेल्या एम-एच 47 के 4459 या इरटीका गाडीला भरधाव वेगात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर एम-एच 05 सी एम 1215 या गाडीने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे दोन्ही गाड्या पलटी होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्या. अपघात एवढा भयंकर होता की, यामध्‍ये स्विफ्ट डिझायर मधील सुमित रोचलाणी (वय 28, रा. उल्हास नगर ठाणे) यांचा जागीच मृत्यू झाला. गाडीतील इतर जखमींना ताबडतोब निगडीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघातात गंभीर जखमी झालेली हितिका सुमित रोचलाणी या 9 महिन्याच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रोचलाणी कुटुंबातील इतर 3 जणांचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यात रवी तुळशीराम रोचलानी (२५), विना ज्ञानचंद रोचलाणी (48) आणि मृत चिमुकलीच्या आईचा समावेश आहे. अपघातात दोन्ही गाड्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर इरटीका या गाडीतील नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो...

बातम्या आणखी आहेत...