आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिनीज बुकात अनोखा विक्रम नावावर असलेला हा नेता यामुळे पुन्हा आला चर्चेत....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय वर्ष ९१. नागपूर आधिवेशनाला एस.टी ने प्रवास करणारे एकमेव आमदार गणपतराव देशमुख.... - Divya Marathi
वय वर्ष ९१. नागपूर आधिवेशनाला एस.टी ने प्रवास करणारे एकमेव आमदार गणपतराव देशमुख....

मुंबई-  भारतीय लोकशाहीतील आदर्श नेता मानले जाणारे आमदार गणपतराव देशमुख हे सध्याच्या राज्याच्या विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आहेत. वयाच्या 91 व्या वर्षीही ते राजकारणात पूर्णपणे कार्यरत आहेत. एक झेंडा, एक पक्ष, एक मतदारसंघ आणि तीन-चार पिढ्यांचे प्रतिनिधित्व करत 11 वेळा विधानसभेत जाणारे व गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेले रेकॉर्ड ब्रेक आमदार म्हणून गणपतराव देशमुख उभ्या महाराष्ट्राला माहित आहेत. मात्र, आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

 

डेंग्यूने आजारी असताना थंडीच्या काळात नागपूरला हिवाळी अधिवेशनाला जाण्यास टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतर त्यांनी तेथे जाणे आपले कर्तव्य समजले. विधीमंडळापासून काही लांब अंतरावर त्यांची आमदार निवासात राहण्याची सोय होती. तेथून ते कारने बडेजाव न करता साध्या परिवहन महामंडळाच्या एसटी बसने विधीमंडळात पोहचले. सोबत होती एक बॅग आणि एक पीए. वयाच्या या टप्प्यावर गणपतराव यांनी आदर्श विचारसरणी व कृतीतून साधेपणा जगाला एक उदाहरण घालून दिले आहे. आज या निमित्त आपण वाचूया या आदर्श नेत्याबाबत...

 

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी सांगोला (जिल्हा. सोलापूर) येथे झाला. त्यांचा पिंड मूळ चळवळीतला असल्यामुळे आपसूकच शेतकरी कामगार पक्षाकडे वळले. पुढे 1962 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा विधानसभेत धडक मारली. त्यानंतर त्यांनी सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातून 11 वेळा निवडून येत देशात आदर्श नेतृत्व असल्याचे सिद्ध केले. यावर्षी विधानमंडळात 54 वर्षांहून अधिक कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. 2009 मध्ये दहावी निवडणूक जिंकत गणपतरावांनी तामिळनाडूच्या एम. करुणानिधी यांची बरोबरी केली आणि 2014 मध्ये 11 वी निवडणूक जिंकून विक्रम मोडला.

 

आपल्या 55 वर्षाच्या कारकीर्दीत ते 1978 मधील पुलोद व 1999 आघाडी सरकारमधील काही वर्षे मंत्रीपदाचा अपवाद वगळता ते सतत विरोधी बाकावरच बसत आले आहेत. 1972 आणि 1995 मध्ये त्यांना पराभवही पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची तळागाळातील जनतेशी असणारी नाळ आणखी घट्ट झाली. त्याच काळात त्यांनी जनसंपर्क वाढवून मजबूत स्थान निर्माण केले. त्यांची संपूर्ण कारकीर्द निष्कलंक असून ते संचालक असलेल्या सूतगिरणीच्या सभेसाठी घरचा डबा घेऊन जातात. सहकाराच्या पडत्या काळात आणि दुष्काळाच्या पट्टय़ातील आदर्श सुतगिरणीचे आदर्श मॉडेल त्यांनी सर्वांपुढे ठेवले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते फडणवीसांपर्यंत (जोशी व राणे वगळता) सर्वाचे कामकाज त्यांनी पाहिले आहेत. नागपूरच्या अधिवेशनाचे 54 हिवाळे पाहणारे सध्याच्या विधानसभेत ते एकमेव ज्येष्ठ आमदार आहेत.

 

थोर राजकारणी, राज्याचा चौफेर अभ्यास असणारे चालते बोलते विद्यापीठ, लोकशाहीच्या इतिहासाने दखल घेतलेले लोकप्रतिनिधी, पुरोगामित्वाचा आवाज बुलंद करणारे, सभागृहातील पेचप्रसंगाची कोंडी फोडणारे, आयुष्याला चळवळ समजून जगणारे, नव्वदीतही तरुणाला लाजविणारे अभ्यासपूर्ण नेतृत्व करत सभागृहाला स्तब्ध करणारे एकमेव आमदार गणपतराव देशमुख वयाच्या 91 व्या वर्षीही फिट अॅंड फाईन आहेत.

 

आज आपण त्यांच्याविषयी माहिती घेऊया.... पुढे स्लाईडद्वारे क्लिक करून पाहा.... 

बातम्या आणखी आहेत...