आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलुंडच्या नाट्यसंमेलनाची वेगळीच नांदी...जिवंत कलावंताला वाहिली श्रद्धांजली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलुंड- शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या 98 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कालिदास नाट्यमंदिरात पडदा थोड्याच वेळात उघडणार आहे.  संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, नट प्रसाद सावकार यांना त्यांच्या हयातीतच त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रताप करून नाट्य परिषदेने नाट्य संमेलनाची वेगळीच नांदी गायिली. सावकार हयात असल्याचे लक्षात आणून दिल्यावर घाईघाईने सावकार यांचे छायाचित्र हटविण्यात आले.

 

नाट्य परिषदेने संमेलनात पुल देशपांडे, चिंतामणराव कोल्हटकर, सदाशिव अमरापूकर, रसिका जोशी, निळू फुले या दिवंगत नाटककार, कलाकारांसोबतच हयात असलेले संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक नट प्रसाद सावकार यांचे देखील छायाचित्र होर्डिंगवर लावले होते. पण ही चूक संयोजकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने प्रसाद सावकारांचे छायाचित्र होर्डिंगवरुन हटवले.

बातम्या आणखी आहेत...