आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 99.81% मतदान; तडीपार नगरसेवकाचे मतदान राेखले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा जागांसाठी साेमवारी सरासरी ९९.८१ टक्के मतदान झाले.  लातूर- उस्मानाबाद- बीड मतदारसंघात ९९.९० %, नाशिकमध्ये १०० %, सिंधुदुर्ग- रत्नागिरी- रायगडमध्ये ९९.७९ %, अमरावतीत ९९.८० %,  परभणी- हिंगाेलीत ९९.६० %,  वर्धा- चंद्रपूर- गडचिराेलीत ९९.७२ टक्के मतदान झाले.  


या सहाही मतदारसंघात किरकाेळ प्रकार वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.  अाता २४ मे राेजी मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेईल. मराठवाड्यातील लातूर- उस्मानाबाद- बीडमध्ये एकुण १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदान केले. तर परभणी- हिंगाेलीतील एकुण ५०१ मतदारांपैकी ४९९ मतदारांनी मतदान केले.  तडीपार असलेला हिंगाेलीचा अपक्ष नगरसेवक नरसिंग नायक यालाही पाेलिसांनी मतदानापासून राेखले. अनेक गुन्हे असल्याने नायकला तडीपार केले अाले अाहे. मात्र तरीही ताे साेमवारी हिंंगाेली तहसीलमध्ये मतदानासाठी अाला हाेता, मात्र पाेलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेऊन हद्दीबाहेर नेऊन साेडले.

 

लातूर: दिलीपराव देशमुखांनी करवून घेतले काँग्रेसचे मतदान

लातूर-उस्मानाबाद-बीड विधान परिषद निवडणुकीत सोमवारी लातूर जिल्ह्यात १००   टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील मावळते आमदार तथा लातूर काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख सकाळपासून काँग्रेस भवनमध्ये तळ ठोकून होते. तेथेच त्यांनी काँग्रेसच्या सर्व मतदारांना एकत्र बोलावले होते. तेथून सूत्रे हलवत त्यांनी काँग्रेसच्या मतदारांचे मतदान करवून घेतले. तर सहलीवर गेलेले भाजपचे नगरसेवक थेट मतदान केंद्रावरच परतले. मतदान केंद्रापासून जवळच गाड्या थांबवून नगरसेवक मतदारांना एकत्रितपणे नेण्यात आले.      
राजीव गांधींच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना काँग्रेस भवनात आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला हजेरी लावत दिलीपराव देशमुखांनी तेथे काँग्रेस मतदारांची बैठक घेतली. तेथूनच सर्वांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पाच-पाचचे गट करून काँग्रेस नगरसेवकांनी मतदान केले. तर भाजपचे सहलीवर गेलेले नगरसेवक एक वाजण्याच्या सुमारास लातूरमध्ये दाखल झाले.   

 

काँग्रेसची मंडळी दक्ष   
दरम्यान,  रमेश कराडांनी ऐनवेळी माघार घेतल्याचा फटका अशोक जगदाळेंना बसेल याची चर्चा होत होती. मात्र त्याचा आघाडी पुरस्कृत उमेदवारावर कसलाच परिणाम होणार नसल्याचा दावा लातूर काँग्रेसने केला. आमचा विजय नक्की आहे,  असे आघाडीच्या वतीने सांगण्यात आले. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही

 

पुढील स्लाईडवर वाचा , इतर जिल्ह्यातील मतदाना विषयी ....