आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका भव्य होता अंबानींच्या घरातील सोहळा; आकाश-श्लोकाच्या साखरपुड्याचे Inside Videos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतातील सर्वात धनाढ्य उद्योजक मुकेश अंबानी यांचे घर एंटिलिया येथे त्यांचा मुलगा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली. या भव्य-दिव्य अशा सोहळ्याचे काही आतील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. बाहेरून एंटिलिया जितका भव्य वाटतो आतून तो तेवढाच आकर्षक आहे. त्यामध्ये नेते, अभिनेते आणि उद्योजकांसह साऱ्या देशातून आलेले चर्चित चेहरे दिसून आले.


एकत्रित शिकले आकाश-श्लोका
- 26 वर्षीय आकाश हा नीता आणि मुकेश अंबानी यांच्या तीन मुला-मुलींमध्ये सर्वात ज्येष्ठ पुत्र आहे. ईशा त्याची जुळी बहिण असून अनंत अंबानी त्याचा धाकटा बंधू आहे. 
- श्लोका हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. अंबानी आणि मेहता परिवार एकमेकांचे परिचित आहेत. आकाश आणि श्लोका एकाच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले आहेत. 
- आकाशने रोड आइलंड, अमेरिकेत असलेल्या ब्राउन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डिग्री घेतली आहे. ते रिलायन्स ग्रुपचे टेलिकॉम व्हेंचर जिओच्या मंडळात आहेत. 

 

कोण आहे श्लोका मेहता?
- श्लोका हिरे व्यापारी रसेल मेहता यांची सर्वात लहानी मुलगी आहे. रसेल रोजी ब्लू डायमंड्सचे मालक असून Orra ब्रँडने डायमंडचे रीटेल बिझनेस करतात. 
- त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी न्यूयॉर्क आणि मुलगा हाँगकाँगमध्ये सेटल आहेत. 
- आकाश आणि श्लोका एकाच शाळेत शिकले. यानंतर श्लोकाने प्रिंस्टन विद्यापीठातून एंथ्रोपॉलिजीत शिक्षण घेतले. तसेच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये मास्टर डिग्री घेतली. 
- डिग्री घेतल्यानंतर 2014 मध्ये रोजी ब्लू फाउंडेशनच्या संचालक पदाची सूत्रे सांभाळली. बिझनेसवुमनसह श्लोका एक सोशल वर्कर आहे. 2015 मध्ये तिने कनेक्ट फॉर नावाची संस्था सुरू केली. त्यामध्ये गरजवंतांना शिक्षण, खाद्य, आणि राहण्याची जागा उपलब्ध करून दिली जातो. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या सोहळ्याचे आणखी काही Inside Photos, Videos

बातम्या आणखी आहेत...