आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्याच्या विभाजनासाठी सर्व आमदारांची एकत्रित बैठक;चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठवाडा विभागाचे विभाजन करून दाेन नवे जिल्हे करावेत, या मागणीवर मराठवाड्यातील सदस्यांनी जाेरदार मागणी केली. यावर जिल्ह्यांचे विभाजन करण्याबाबत व्यावहारिकता पाहून, अभ्यास करून निर्णय घेऊ. या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून त्यांच्या अहवालानंतर निर्णय घेत असतानाच दाेन्ही सभागृहातील सदस्यांची एकत्रित बैठक घेऊन यावर निर्णय घेण्यात येईल, असे अाश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाेत्तराच्या तासात दिले.  


राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला हाेता. पंडित म्हणाले, सातत्याने प्रत्येक अधिवेशनात हा प्रश्न विचारला जाताे अाणि तेच ते उत्तर दिले जात अाहे. या संदर्भात दांगट समिती नेमली हाेती. या समितीचा निर्णय काय झाला, असा सवाल त्यांनी केला. यावर उत्तर देताना महसूलमंत्री पाटील म्हणाले, मराठवाड्याचे दाेन भाग व्हावेत, असा निर्णय दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतला हाेता. लातूर या ठिकाणी विभागीय अायुक्त कार्यालय असावे, असा निर्णय हाेता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांनी नांदेडमध्ये हे कार्यालय असावे, अशी भूमिका घेतली हाेती. त्यानंतर नांदेड, बीड जिल्ह्याचे विभाजन करावे, असा प्रस्ताव अाला हाेता. १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये मागणी करण्यात अाली हाेती. या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असून व्यावहारिकरीत्या विभाजन झाले पाहिजे या दृष्टीने ही समिती नेमण्यात अाली अाहे. ६८ जिल्हे व्हावेत अशा सूचनाही अाल्या अाहेत. छाेटे जिल्हे केल्यानंतर प्रशासकीयदृष्ट्या कामकाज करणे साेपे हाेर्इल ही वस्तुस्थिती असली तरी व्यावहारिकता पाहून अभ्यास करावा लागणार अाहे. हा निर्णय लगेच हाेणार नाही. यासाठी वेळ लागणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

 

बीड जिल्ह्याचे विभाजन करा : विक्रम काळे  

राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांनी बीड जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी केली. धनंजय मुंडेंनी  काेणत्या जिल्ह्याचे विभाजन करणार अाहात याची माहिती मागितली. त्यावर पाटील म्हणाले, हा लाेकभावनेचा विषय असून त्यासाठी वेळ लागेल. त्यावर सभापतींनी सभागृहातील दाेन्ही सदस्यांची बैठक घ्यावी, असे निर्देश दिले. त्यावर मध्येच हस्तक्षेप करत शेकापचे जयंत पाटील म्हणाले,  ‘नवे जिल्हे निर्माण करताना त्यासाठी अार्थिक तरतूद केली जाणार अाहे का?’

 

लातूर, नांदेडनंतर परभणीचीही उडी 
राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण म्हणाले, परळी अाणि बीड येथील जनतेच्या भावना तीव्र अाहेत. त्यामुळे या दाेन्ही तालुक्यांचा मध्य साधून कार्यालय करावे, अशी सूचना त्यांनी केली. यावर धनंजय मुंडे यांनी त्यास पाठिंबा दिला. यावर राष्ट्रवादीचे अब्दुल्ला खान दुर्राणी म्हणाले, नांदेड अाणि लातूर याचा मध्य परभणी असून या ठिकाणी विभागीय अायुक्त कार्यालय करावे, अशी मागणी केली. त्यास रामराव वडकुते यांनी पाठिंबा दिला. यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्व पक्षीय सदस्यांची एकत्रित बैठक सभापतींच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली घेऊ. विभाजन दाेन का तीन करायचे याबाबत या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे अाश्वासन त्यांनी दिले. 

बातम्या आणखी आहेत...