आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमत्कार: डोळ्यात घुसलेली गोळी सर्जरी न करता डॉक्टर्सनी नाकातून अशी काढली...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या व्यक्तीच्या डोळ्यात गोळी घुसली होती. जी काढायला अनेक डॉक्टरांनी हात वर केले होते. - Divya Marathi
या व्यक्तीच्या डोळ्यात गोळी घुसली होती. जी काढायला अनेक डॉक्टरांनी हात वर केले होते.

मुंबई- मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमधील डॉक्टर्सनी एक चमत्कारिक कारनामा केला आहे. डॉक्टर्सनी दूर्बिनच्या मदतीने एका व्यक्तीच्या डोळ्यात अडकलेली गोळी नाकाच्या मार्गातून काढली. डॉक्टर्सच्या माहितीनुसार, ही देशातील पहिलीच घटना आहे जेथे अशा प्रकारे एखाद्या शरीरातील गोळी कुठेही जखम किंवा कट न लावता काढली आहे. ज्या व्यक्तीच्या डोळ्यात ही गोळी घुसली होती त्याने आपण जगणार नाही असे गृहितच धरले होते. मात्र, आता डॉक्टर्सच्या अथक प्रयत्नांमुळे हा चमत्कार घडला आहे. अशी घुसली होती डोळ्यात गोळी.....

 

- डोळे, नाक आणि घसा विभागातील डॉक्टरांच्या टीमने उत्तर प्रदेशमधील प्रतापगढमधील राहणा-या अशोक पांडेच्या  उजव्या डोळ्यात घुसलेली गोळी काढण्यात यश मिळवले.
- अशोक पांडे याच्या डोळ्यात 6 डिसेंबरला गोळी मारली गेली होती. अशोक भाजी विक्रेता आहे आणि काही लुटारूंनी त्याला लूटण्यासाठी गोळी मारली होती.
- पिस्तूलची गोळी अशोकच्या उजव्या डोळ्यातील खालच्या बाजूला जाऊन घुसली. या हल्ल्यात अशोक यांचा जीव तर वाचला पण प्रतापगढचे डॉक्टर्स त्याच्या डोळ्यातील अडकलेली गोळी काढू शकत नव्हते.
- गोळी डोळ्यात घुसल्याने त्याच्या जीवाला धोका कायम होता. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले.

 

अशी काढली गेली गोळी- 

 

- बुधवारी अशोकला ऑपरेशन थिएटरमध्ये आणले गेले. जेजेमधील डॉक्टरांनी दुर्बिनीच्या मदतीने गोळीचे ठिकाण शोधून नाकाच्या मार्गातून गोळी काढता येऊ शकते असा विचार केला. त्यानुसार टीमने प्रयत्न केला आणि त्यात यश आले.
- या ऑपरेशनदरम्यान अशोकच्या चेह-यावर व नाकात कुठेही कट मारला नाही. जे जे हॉस्पिटलमधील ईएनटी डिपार्टमेंटचे हेड श्रीनिवास चव्हाण यांनी सांगितले की, अशोकच्या डोळ्यात घुसलेली बुलेटला नाकाच्या मार्गातून बाहेर काढणे सोपे काम नव्हते.
- आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे, बुलेटला शरीरावर कोणतेही चिरफाड न करणे.
- श्रीनिवास चव्हाण यांनी पुढे म्हणाले की, डॉक्टर आता सरकारी रूग्णालयातही दुर्बिनीच्या सहाय्याने उपचार करू लागले आहेत. पूर्वी याबाबतची साधने नव्हती आता मात्र ती उपलब्ध होत आहेत, जे सामान्य पेशंटसाठी आनंदाची बातमी आहे.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...