आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर: काँग्रेसमधून आयात उमेदवार, आता प्रचारकही (योगी) बाहेरून- आदित्य ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरवले आहे. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका करणारी ट्विट केली आहेत

 

भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. तर राज्यातील भाजपचा नेत्यांचा प्रभाव पडत नाही काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच की काय योगी यांना भाजपने पोटनिवडणुकीसाठी प्रचारात आणले काय असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

 

आदित्य ठाकरे यांनी टि्वट करताना म्हटले की, भाजपचा स्वत:च्या कार्यकर्त्यांवर विश्वास नसल्याने त्यांनी काँग्रेसमधून उमेदवार आयात केला. आता राज्यातील नेत्यांवर विश्वास नसल्यानेच योगी यांना यूपीतून पाचारण करत प्रचाराला बोलावले आहे. एवढा प्रचार इतर राज्यातून एका पोट निवडणुकीकरता? काहीतरी जुमला असणारच... इकडच्या नेत्यांना वाटतं की आपल्या राज्याच्या लोकांचा राज्य सरकारवर विश्वास नाही.. की त्या पक्षाचा महाराष्ट्राच्या नागरिकांवर विश्वास नाही म्हणून एवढे इतर प्रचारक, असेही आदित्य यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...