आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांच्या टीकेला अभिनेता अक्षय कुमारचे उत्तर, वाचा काय म्हणाला \'खिलाडी\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अभिनेता अक्षय कुमारचे सिनेमे आणि त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात अक्षयवर टीका केली होती. देशाची काळजी करणाऱ्या अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व का आहे? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला होता. आता या टीकेला अक्षयने उत्तर दिले आहे.

 

अक्षय कुमार म्हणाला की, आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकालाच हवे ते बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे मला अजिबात वाईट वाटले नाही. मला महाराष्ट्रानेच घडवले आहे, आज मी जो आहे, तो महाराष्ट्रामुळेच आहे, राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेचे मला अजिबात वाईट वाटले नाही.  मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात त्याने ही प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...