आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असे दिसते इरफान खानचे मुंबईतील घर, हिने केले इंटीरियर डिझाईन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरफान खानचे घर.... - Divya Marathi
इरफान खानचे घर....

मुंबई- अभिनेता इरफान खानला ब्रेन कॅन्सर असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, याबाबत कोणीही दुजोरा दिलेला नाही. कसदार अभिनयासाठी ओळखला जाणारा इरफानचे मुंबईत लोखंडवाला जवळ मड आयलंडमध्ये अपार्टमेंट आहे जेथे तो पत्नी सुतापा आणि मुलगा बाबाईल आणि आयनसोबत राहतो. हिने केले इंटीरियर डिझाईन...

 

- शबनम गुप्ता या इंटीरियर डिझायनरने इरफानच्या पसंतीनुसार, त्याचे घर सजविले आहे. 
- इरफानच्या पाचव्या मजल्यावरील या अपार्टमेंटमध्ये जशी लिफ्ट थांबते तसे समोर एक ब्लॅक, ब्लू आणि व्हाईट फूलांचे कटआउट डिझाईन सुद्धा लावले आहे. 
- आतून घराला सफेद पांढरा रंगाचे इंटीरियर यूज केले आहे आणि प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या रूम्स बनविल्या आहेत. 
- लिव्हिंग रूम, स्टडी रूम, गेमिंग जोन आदी सुविधा लक्षात घेऊन त्याने आपले घर डिझाईन केले आहे.

 

कोण आहे इरफान खान?

 

- 7 जानेवारी, 1967 रोजी जयपुरमध्ये जन्मलेला इरफान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पासआउट आहे. इरफान आपल्या दमदार व सहज अभिनयासाठी ओळखला जातो.
- 1988 मध्ये मीरा नायरची फिल्म सलाम बॉम्बेमधून त्याने फिल्म डेब्यू केला. ही फिल्म ऑस्कर अवॉर्डसाठी नॉमिनेट झाली होती. 
- इरफानच्या काही खास फिल्ममध्ये हासिल, मकबूल, लाईफ इन मेट्रो, न्यूयॉर्क, द नेमसेक, लाईफ ऑफ पाय, साहब, बीवी और गॅंगस्टर 2 आणि पान सिंह तोमर आदींचा समावेश आहे. 
- 2011 मध्ये त्याला पद्मश्रीने सम्मानित करण्यात आले. 
- 2012 मध्ये त्याला पान सिंह तोमरसाठी बेस्ट अॅक्टरसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

 

क्रिकेटमध्ये करियर करू दिले नाही कुटुंबियांनी- 

 

- इरफान 10 वीतच गेला होता मात्र, त्याच्या वडिलांना मुलाची चिंता लागून राहायची. त्यांचा मुलगा शाळेतून घरी येताच हातात बॅट घेऊन स्टेडियमवर जायचा.
- अखेर त्याची निवड सीके नायडू ट्रॉफीसाठी झाली. दुसरे एखादे कुटुंबिय असते तर ते खूप आनंदी झाले असते. मात्र, त्याच्या कुटुंबियांनी त्याला क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे इरफानचे मन खेळावरून उडाले.
- त्याने क्रिकेट खेळणे सोडून दिले व पदवी घेऊ लागला. 1984 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) मध्ये त्याला स्कॉलरशिपसह प्रवेश मिळाला. येथूनच त्याचे जीवन बदलून गेले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, इरफान खानच्या अपार्टमेंटचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...