आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनेत्री मल्लिका राजपूतची भाजपला सोडचिट्ठी, म्हणाली..पक्षात मी सुरक्षित नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'रिव्हाॅल्वर राणी' या चित्रपटातून अभिनेत्री राणी मुर्खजी हिच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकलेल्या मल्लिका राजपूत हिने भाजप यूथ विंग महाराष्ट्र या पदाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. मल्लिकाने आपण भाजपमध्ये सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी तिने काॅंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता परत काॅंग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते. 

 

मल्लिका हिने उन्नाव आणि कठुआ गँगरेपसारख्या घटना पाहता, एक महिला म्हणून मी भाजपत सुरक्षित नसल्यामुळेच पक्ष सोडत असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी जो पक्ष (भाजप) हिंदू-मुस्लिम दंगली भडकवू शकतो, तो पक्ष महिलांचाही प्रयोग म्हणून वापर करु शकेल, असाही आरोप तिने केला आहे. 

 

पुढील स्लाईडवर वाचा कोण आहे मल्लिका राजपूत?

बातम्या आणखी आहेत...