आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या हिंदी गाण्याच्या व्हिडिओवरून अभिनेत्री रेणूका शहाणेंचा निशाणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री रेणूका शहाणे - Divya Marathi
अभिनेत्री रेणूका शहाणे

मुंबई- आपल्या राज्यात राज्यपालांचा संदेश मराठीत भाषांतरित करायला विसरला जातो आणि मुंबईच्या नद्यांबद्दल सरकार जे गाणं बनवतं ते हिंदीत बनवतं हे फार दुर्भाग्यपूर्ण आहे. आपल्या महाराष्ट्रात मराठीची ही गत असेल तर आपल्या मराठी भाषेचा मान वाढणार कसा असा सवाल करत अभिनेत्री रेणूका शहाणे यांनी राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यासाठी सर्व उच्च पदांवरील मराठी भाषिकांनी झटलं पाहिजे. सोबतच आपल्या घरांमध्ये मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, असं मतही रेणूका यांनी मांडले आहे. 

 

मंगळवारी (27 फेब्रुवारी) सर्वत्र मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. यावेळी हजार वर्षाहून जुनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे यासाठी #अभिजातमराठी हा हॅशटॅग वापरत मोहिम चालवली गेली. त्याचवेळी रेणूका शहाणे यांनी आपले मत मांडत आपण मराठी भाषक लोकच कसे मराठीबद्दल अनास्था बाळगून आहोत याचे उदाहरण देऊन शल्य मांडले.

 

रेणूका शहाणे यांनी त्यासाठी राज्याच्या विधीमंडळात राज्यपालांचे भाषण गुजरातीमध्ये अनुवादित झाले पण मराठीत अनुवाद केले नाही यावर नाराजी व्यक्त केली. सोबतच मुंबईतील नद्यांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह चित्रित केलेले गाणं हिंदीत बनविण्याबाबतही त्यांनी नाराजी टि्वटद्वारे व्यक्त केली. हे फार दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणत आपल्या महाराष्ट्रात मराठीची ही गत असेल तर आपल्या भाषेचा मान कसा वाढेल असा सवाल केला आहे. 

 

सोबतच मराठी भाषा टिकवायची असेल तर त्यांनी एक कल्पना मांडली. मराठी शाळा बंद करण्याऐवजी मराठी शाळांमध्ये उत्तम इंग्रजी शिकवा आणि राज्यातील सर्व इंग्रजी शाळांमध्ये उत्तम मराठी शिकवा असे मतही व्यक्त केले आहे.

 

दरम्यान, रेणूका शहाणे यांनी टि्वटरद्वारे मांडलेले हे मत मराठी जणांना चांगलेच पसंतीस पडले आहे. अनेकांनी रेणूका शहाणेंचे कौतूक केले तर शेकडो जणांनी त्यांचे टि्वट रिटि्वट व लाईक केले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...