आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकांक्षापुढे गगन ठेंगणे... आदिवासी विद्यार्थ्यांनी सर केला माऊंट एव्हरेस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुबंई- जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणा-या माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे,प्रमेश आळे, उमाकांत मडवी,कविदास कातमोडे हे चार विदयार्थी यशस्वी ठरले आहेत.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर, जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विदयार्थ्यातील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत मिशन शौर्यची आखणी केली. प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच विभागातर्फे राबविण्यात आला.

 
मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, , विकास सोयाम, इंदू कन्नाके,छाया आत्राम हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्स मधील आदिवासी कुटुंबांतील मुले-मुली आदिवासी विकास विभागाच्या वतीने गेल्या महिन्यात मिशन शौर्यवर निघाले होते. जुलै 2017 पासtन या विदयार्थ्याचे  प्रशिक्षण सुरु झाले होते. दार्जिलिंग,लेह लडाख या ठिकाणी या मुलांना प्रशीक्षकांकडुन गिर्यारोहणाचे प्रशीक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात 1 एप्रिल रोजी हे विदयार्थी मुंबईवरुन काठमांडूला रवाना झाले होते.

 

मोहिमेवर जाण्यापुर्वी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, राज्यपाल विदयासागरराव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी या विदयार्थ्याना भेटुन प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या.  या मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच 15 शेर्पा, एक high altitude तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.या मोहीमेतील अन्य विकास सोयाम व इंदु कन्हाके हे ही लवकरच लक्ष्य गाठतील व अन्य विदयार्थ्याची चढाई सुरू असून लवकरच तेही एव्हरेस्ट सर करतील .

 

आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण- मंत्री विष्णु सवरा

आदिवासी विकास विभागाच्या वतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर लावण्यात आदिवासी विदयार्थी विदयार्थीनी यशस्वी ठरले आहेत.  आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असल्याचे मंत्री विष्णु सवरा यांनी सांगितले. या चारही जणांचे अभिनंदन मंत्री महोदयांनी केले. तर विभागातर्फे राबविण्यात आलेला हे पहिलेच धाडसी मिशन होते यामध्ये विदयार्थ्यानी मिळवलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही आदिवासी विदयार्थ्याच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील.मिशन शौर्यशी निगडीत प्रत्येकाचे हे यश असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या प्रधानसचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...