आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क भरूनच प्रवेश द्या - चंद्रकांत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी निम्मे शुल्क घेऊन प्रवेश देण्याच्या सूचना प्रत्येक महाविद्यालयाला देण्यात आल्या. निम्मे शुल्क सरकार भरेल. ही सवलत न देणाऱ्यांवर कारवाई होईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी म्हणाले.


मराठा माेर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू झालेल्या व्याज परतावा योजनेत सहभागी होणाऱ्या मराठा समाजातील उद्योजकांना १० लाखांपर्यंतच्या कर्जावरील व्याज राज्य शासन भरेल. परंतु पहिल्या महिन्यात व्याज व मुद्दलाचा बोजा पडणार असल्यामुळे त्यांचे पहिल्या महिन्याचे कर्जावरील व्याज व मुद्दलाची रक्कम बँकेत भरण्यात येईल. दुसऱ्या महिन्यापासून व्याजाची रक्कम लाभार्थींच्या बँक खात्यात महामंडळामार्फत देण्यात येणार असल्याचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...