आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीनच्या अडचणी वाढल्या, पत्नीच्या कॉल डिटेल्स काढण्याच्या आरोपात अभिनेत्याच्या वकीलाला अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रातील ठाणे पोलिसांनी कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) लीक प्रकरणी शुक्रवारी रात्री अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील रिजवान याला अटक केली आहे. वकीलावर आरोप आहे की त्याने प्रशांत पालेकर नावाच्या एका खासगी गुप्तहेराकडून नवाजुद्दीनची पत्नी अंजलीचे कॉल डाटा रेकॉर्डिंग मिळवले होते. क्राइम ब्रँचने केलेल्या चौकशीत रिझवानने सांगितले की त्याने नवाजच्या सांगण्यावरुन सीडीआर काढला होता. यामुळे नवाजुद्दीन अडचणीत आला आहे. क्राइम ब्रँचच्या चौकशीला नवाजने सहकार्य केले नाही तर त्याच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. 

 

रिझवान विरोधात ठोस पुरावे - पोलिस 
- हेरगिरीच्या या प्रकरणात पोलिसांनी नवाजची पत्नी अंजली आणि वकील रिझवान यांना समन्स बजावला होता, मात्र ते चौकशीला आले नाही. 

 

नवाजने सर्व आरोप फेटाळले 
- नवाजुद्दीन सिद्दीकीने मीडियासोबत बोलताना त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले होते. तो म्हणाला, 'माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. माझ्या पत्नीसोबत माझे चांगले संबंध आहे. आताही तुम्ही पाहू शकता की पत्नी आणि मी एकत्र फिरुन आलो आहोत.'
- तर अंजलीने म्हटले होते, पोलिसांनी मला कोणतेही समन्स पाठवले नाही.  

बातम्या आणखी आहेत...