आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलगर्ल झायरा छेडछाड प्रकरण: आरोपी संपूर्ण प्रवासादरम्‍यान झोपून होता, एअरलाइन्‍सचे स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दंगलगर्ल झायरा वसिम छेडछाड प्रकरणी विस्‍तारा एअरलाइन्‍सच्‍या संचालकांनी विमान वाहतूक संचलनालय (डीजीसीए) आणि नागरी उड्डयन मंत्रालयाला अहवाल सादर केला आहे. अहवालानूसार आरोपी व्‍यावसायिक विकास सचदेव संपूर्ण प्रवासादरम्‍यान झोपून होता.

 

झोपण्‍यापूर्वी त्‍याने केबिन क्रूला चादर मागितली होती व नंतर डिर्स्‍टब न करण्‍याबद्दल सांगितले होते. फ्लाइटमध्‍ये त्‍याने जेवणही केले नव्‍हते. विमान मुंबईल लँड करत असताना झायराचे त्‍याच्‍यासोबत खटके उडाले. तेव्‍हा क्रूमेंबर्सनी झायराशी बोलण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र झायरा ताबडतोब निघून गेली. नंतर क्रूला झायराच्‍या आईने घडलेल्‍या प्रकाराबाबत सांगितले. झायराने 10 डिसेंबर रोजी विस्‍तारा एअरलाइन्‍सच्‍या दिल्‍ली-मुंबई फ्लाइटमध्‍ये छेडछाड झाल्‍याचा आरोप करत एक व्हिडिओ इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केला होता.

 

झायराची आई म्‍हणाली, लँडिग करताना छेडछाडीबाबत माहिती झाली
- झायराच्‍या आईने विमान मुंबईला लँड होत असताना के‍बिन क्रूला याबाबत माहिती दिली. तेव्‍हा क्रूने तुम्‍ही आधीच याची माहिती का दिली नाही? असे विचारले. यावर झायराच्‍या आईने, मलादेखील ही घटना लँडिग करतानाच कळाली, असे सांगितले. नंतर क्रूने झायराच्‍या आईला तक्रार दाखल करण्‍याबाबत आणि आरोपीला ताब्‍यात घेण्‍याविषयी विचारले, मात्र झायराच्‍या आईने यावर काहीही उत्‍तर दिले नाही.


5-10 मिनिटापर्यंत माझ्या मानेला आणि कंबरेला टच करत होता- झायरा
- 10 डिसेंबररोजी शनिवारी रात्री विस्‍तारा एअरलाइन्‍सने दिल्‍ली ते मुंबई प्रवास करताना झायरासोबत ही घटना घडली होती. याबद्दल आपल्‍या इन्‍स्‍टाग्राम स्‍टोरीमध्‍ये झायराने लिहिले आहे की, 'फ्लाइटमध्‍ये माझ्या ठिक मागे एक मध्‍यम वयाचा माणूस बसला होता. फ्लाईटमधील अंधाराचा फायदा घेत तो सारखे माझ्या मानेला आणि कंबरेला पाय घासत होता. मी ताबडतोब याचा विरोध केला. मात्र फ्लाईटमधील गडबडगोंधळाचे त्‍याने कारण दिले. त्‍यामुळे मी शांत बसले. मात्र काही वेळाने त्‍याने पुन्‍हा तसे करणे सुरु केले. मी फ्लाइट क्रूकडेही याची तक्रार केली. मात्र त्‍यांनी कोणतीच मदत केली नाही. शेवटी याचा व्हिडिओ बनवण्‍याचा मी प्रयत्‍न केला. मात्र फ्लाईटमधील अंधारामुळे तेही शक्‍य झाले नाही.'
- मुंबई विमानतळावर पोहोचल्‍यावर झायरने इन्‍स्‍टाग्रामवर याबाबतचा लाईव्‍ह व्हिडिओ होता. त्‍यामध्‍ये झायरा म्‍हणते, 'मी नुकतेच मुंबईला लँड झाले आहे. माझ्यासोबत जे घडले त्‍यामुळे मी पूर्णपणे डिर्स्‍टब झाली आहे. तुम्‍ही मुलींना अशा पद्धतीने वागणूक देणार आहात का? हे भयंकर आहे. यात सगळ्यात वाईट गोष्‍ट म्‍हणजे अशावेळी तुमच्‍या मदतीला कोणीही येत नाही. तुम्‍हालाच तुमची मदत करावी लागते', हे सांगताना झायराला अश्रू अनावर झाले होते.


POCSO अंतर्गत गुन्‍हा दाखल
- याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी आरोपीला रविवारी रात्री अटक केली होती. आरोपी 39 वर्षीय असून त्‍याचे नाव विकास सचदेव आहे.
- आरोपीविरोधात आयपीसी सेक्‍शन 354 अंतर्गत (विनयभंग करण्‍याच्‍या हेतूने महिलेवर हल्‍ला करणे) आणि प्रोटेक्‍शन ऑफ चिल्‍ड्रन फ्रॉम सेक्‍शुअल ऑफेंस  (POCSO) अॅक्‍ट अंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

आरोपीच्‍या पत्‍नीने फेटाळले आरोप
- दुसरीकडे आरोपी विकासच्‍या पत्‍नीने आपल्‍या पतीवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्‍या म्‍हणाल्‍या, 'माझे पति निर्दोष आहेत. झायराला त्रास देण्‍याचा त्‍यांचा कोणताही हेतू नव्‍हता. त्‍यांच्‍या कुटुंबातील एका मुलाचा मृत्‍यू झाला होता. त्‍यासाठी ते दिल्‍लीला गेले होते. 24 तासापासून ते जागीच होते. त्‍यामुळेच त्‍यांनी क्रूला सांगितले होते की, मला झोपायचे आहे, डिर्स्‍टब करु नका'  
- 'त्‍यांचा पाय झायराच्‍या खांद्याजवळ होता. मात्र त्‍यांचा त्रास देण्‍याचा हेतू नव्‍हता. झायरादेखील तेव्‍हा काहीच म्‍हणाली नाही. मात्र आता असे आरोप का करत आहे, हे माहिती नाही. नक्‍कीच काहीतरी गैरसमज झालेला असावा. आम्‍हाला देखील मुले आहेत. आम्‍ही असे कधीच वागू शकत नाही. आम्‍हाला न्‍याय पाहिजे', असे आरोपीच्‍या पत्‍नीने म्‍हटले आहे.


झायराने तक्रार केली नाही- एअरलाइन्‍स
- याप्रकरणी विस्‍तारा एअरलाइन्‍सतर्फे सांगण्‍यात आले आहे की, प्रवासादरम्‍यान झायरा त्‍या प्रवाशावर फक्‍त ओरडली. तिने याबाबत कोणतीही तक्रार दाखल केली नाही. लँडिगनंतर क्रूने झायरा आणि तिच्‍या आईला तक्रार दाखल करण्‍याविषयी सांगितले होते. मात्र यास त्‍यांनी नकार दिला.

 

आतापर्यंत काय कारवाई झाली?
- हे प्रकरण समोर आल्‍यानंतर महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोग आणि दिल्‍ली महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत विस्‍तारा एअरलाइन्‍सला नोटीस पाठविली आहे.
- उड्डयन मंत्रालयानेही विस्‍ताराला अहवाल मागितला होता.
- मुंबई पोलिसांनीही तातडीने या प्रकरणामध्‍ये लक्ष देत चौकशीसाठी झायराची हॉटेलमध्‍ये जाऊन भेट घेतली होती.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, झायराने इन्‍स्‍टाग्रामवर पोस्‍ट केलेला व्हि‍डिओ आणि शेअर केलेली इन्‍स्‍टाग्राम स्‍टोरी...

बातम्या आणखी आहेत...