आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुकेश अंबानी यांचे घर एंटिलिया येथे त्यांचा मुलगा आकाश आणि श्लोका मेहता यांची एंगेजमेंट सेरेमनी पार पडली. तत्पूर्वी गुरुवारी प्री-एंगेजमेंट पार्टी देखील आयोजित करण्यात आली. यात बॉलिवूड, स्पोर्ट्स जगतासह विविध क्षेत्रातील लोकप्रीय चेहरे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे, एंगेजमेंट पार्टीला सुद्धा सेलिब्रिटी, राजकारणी आणि उद्योजकांनी शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमात उपस्थिती लावली.
एकत्रित शिकले आकाश-श्लोका
- 26 वर्षीय आकाश हा नीता आणि मुकेश अंबानी यांच्या तीन मुला-मुलींमध्ये सर्वात ज्येष्ठ पुत्र आहे. ईशा त्याची जुळी बहिण असून अनंत अंबानी त्याचा धाकटा बंधू आहे.
- श्लोका हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. अंबानी आणि मेहता परिवार एकमेकांचे परिचित आहेत. आकाश आणि श्लोका एकाच धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकले आहेत.
- आकाशने रोड आइलंड, अमेरिकेत असलेल्या ब्राउन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डिग्री घेतली आहे. ते रिलायन्स ग्रुपचे टेलिकॉम व्हेंचर जिओच्या मंडळात आहेत.
कोण आहे श्लोका मेहता?
- श्लोका हिरे व्यापारी रसेल मेहता यांची सर्वात लहानी मुलगी आहे. रसेल रोजी ब्लू डायमंड्सचे मालक असून Orra ब्रँडने डायमंडचे रीटेल बिझनेस करतात.
- त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी न्यूयॉर्क आणि मुलगा हाँगकाँगमध्ये सेटल आहेत.
- आकाश आणि श्लोका एकाच शाळेत शिकले. यानंतर श्लोकाने प्रिंस्टन विद्यापीठातून एंथ्रोपॉलिजीत शिक्षण घेतले. तसेच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये मास्टर डिग्री घेतली.
- डिग्री घेतल्यानंतर 2014 मध्ये रोजी ब्लू फाउंडेशनच्या संचालक पदाची सूत्रे सांभाळली. बिझनेसवुमनसह श्लोका एक सोशल वर्कर आहे. 2015 मध्ये तिने कनेक्ट फॉर नावाची संस्था सुरू केली. त्यामध्ये गरजवंतांना शिक्षण, खाद्य, आणि राहण्याची जागा उपलब्ध करून दिली जातो.
गोव्यात केले होते प्रपोज
- दोघांची प्री-एंगेजमेंट सेरेमनी याच वर्षी 24 मार्च रोजी गोव्यातील एक्झॉटिक रिसॉर्ट अॅन्ड स्पा येथे पार पडली. येथे फुलांनी सजलेल्या एका मंचावर 8 मिनिटांचा व्हिडिओ शूट करण्यात आला. त्यावर आकाशने श्लोकाला फिल्पी स्टाइलमध्ये प्रपोज केले. तसेच श्लोका ते स्वीकारताना दिसून आली.
- यानंतर झालेल्या डान्समध्ये आकाश आणि श्लोका एकत्रित थिरकले. यात जवळच्या मित्र-परिवारांचा समावेश होता. याच वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचा विवाह होत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या एंगेजमेंटमध्ये पोहोचलेले इतर सेलिब्रिटी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.