आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय मैत्रिणीसोबत लग्न करतोय आकाश अंबानी, पाहा त्याच्या भावी पत्नीचे प्रोफाईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्लोका मेहता रोजी ब्ल्यू डायमंड्सची डायरेक्टर आहे. - Divya Marathi
श्लोका मेहता रोजी ब्ल्यू डायमंड्सची डायरेक्टर आहे.

मुंबई- मुकेश अंबानींचा थोरला मुलगा आकाश अंबानींचे लग्न ठरले आहे. रिपोर्ट्सनुसार, डायमंड व्यापारी रस्सेल मेहता यांची मुलगी श्लोका अंबानी कुटुंबाची सूनबाई बनणार आहे. आकाश भारतातील मोस्ट एलिजिबल बॅचलर्सपैकी एक आहे. सध्या तो रिलायन्स जियोला हेड करत आहे. आज आम्ही आकाश अंबानीच्या होणा-या भावी पत्नीबाबत माहिती सांगणार आहोत.

 

कोण आहेत रस्सेल मेहता-

 

- रस्सेल मेहता रोजी ब्ल्यू डायमंड्सचे मालक आहे आणि Orra ब्रॅंडच्या नावाने ते डायमंड विकतात. त्यांची पत्नी मोना मेहता हाउसवाईफ आहे. 
- त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी न्यूयॉर्क आणि मुलगा हाँगकाँगमध्ये सेटल्ड आहेत.

 

आकाशची स्कूल फ्रेंड आहे श्लोका-

 

- आकाश अंबानीची भावी पत्नी आणि रस्सेल मेहताची छोटी मुलगी श्लोका रोजी ब्ल्यू डायमंड्समध्ये डायरेक्टर आहे. 
- श्लोकाचे स्कूलिंग धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. आकाश तिचा स्कूलमेट राहिला.
- यानंतर न्यू जर्सीतील प्रिन्स्टन यूनिवर्सिटीतून तिने एंथ्रोपोलॉजी (मानव्यशास्त्र) पदवी घेतली.
- श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स एंड पॉलिटिकल सायन्समधून लॉ मध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे.
- बिजनेस लेडी असल्या कारणाने श्लोका एक सोशल वर्कर सुद्धा आहे. तिने 2015 मध्ये कनेक्ट फॉर नावाची NGO स्टार्ट केली होती. ज्याद्वारे ती गरजूंना शिक्षण, फूड, शेल्टर आदींची मदत करते.

 

बहिण-जीजा - दिया आणि आयुष जाटिया-

 

- श्लोकाची मोठी बहिण दिया जाटिया न्यूयॉर्कमध्ये मॅनहॅटनमध्ये राहते.

- दियाचा पती आयुष जाटिया मुंबईमधीलच आहे. त्याने न्यूयॉर्क यूनिवर्सिटीतून इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतली आहे. 

 

भाऊ- वहिणी - विराज आणि निशा मेहता-

 

विराज आपली पत्नी निशा मेहतासह हाँगकाँगमध्ये राहतो. 
श्लोकाची वहिणी निशाने कार्डिफ यूनिवर्सिटीतून अकाउंटिंग एंड मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, श्लोका मेहताशी संबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...