आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Forbes List: अक्षय सलमानच्या पुढे; चित्रपटगृह मालकांना, वितरकांनाही देतो नफ्यातील वाटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - फाेर्ब्जच्या यंदाच्या यादीनुसार अक्षयकुमारने कमाईबाबत सलमान खानलाही मागे टाकले अाहे. अक्षयने ४.०५ काेटी डाॅलर्स कमावले अाहेत. असे हाेण्यामागे अनेक कारणे अाहेत. याबाबत माहिती देताना वितरक अक्षय राठी सांगतात की, अक्षयकुमारला निर्माते, दिग्दर्शक व वितरकांची पहिली पसंती असते. कारण ताे इतर माेठ्या कलाकारांसारखा अव्वाच्या सव्वा मानधन घेत नाही. प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या चित्रपटांच्या पहिल्या अाठवड्याच्या नफ्याचा ५० % हिस्सा वितरक व चित्रपटगृहमालकांना दिला जाताे. इतर कलाकार असे करत नाहीत. पहिल्या अाठवड्याची कमाई ते स्वत:कडेच ठेवतात. त्याला चित्रपटाचे बजेट माहीत असते. त्यामुळेच कंटेटवर केंद्रित चित्रपटांचे ताे मानधन घेत नाही. त्याला चित्रपटावर पूर्ण विश्वास असताे.

 

बाॅक्स अाॅफिसवर कमाई केल्यानंतर अक्षयकुमार चित्रपटाचा नफा वरील सर्वांत वाटताे. उदा- 'एअरलिफ्ट'. त्याने या चित्रपटाचे मानधन घेतले नव्हते. तसेच या चित्रपटाने चांगली कमाई केल्यानंतर त्याच्या नफ्यातील वाटा इतरांनाही दिला. परिणामी, चित्रपटाच्या निर्मितीवर बजेटचा ताण पडला नाही. हा चित्रपट मी खूप कमी बजेटमध्ये बनवला. त्यातून अक्षयकुमारचे मानधन साेडले तर व्हीएफएक्स वगैरेचा खर्च मिळून एकूण २८ काेटी रुपयेच लागले. तसेच नंतर चित्रपटाने १०० काेटींचा व्यवसाय केल्याने त्यातील नफा त्याने इतरांना शेअर केला. अशा प्रकारचा पुढाकार त्याने कंटेंटवर केंद्रित असलेल्या चित्रपटांबाबतही घेतला, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांनी सांगितले.

 

याबाबत व्यवसायतज्ज्ञांचे म्हणणे अाहे की, अक्षयकुमार हा एक समजदार बिझनेसमॅन अाहे. ताे साेन्याचे अंडे देणाऱ्या काेंबडीला सर्व अंडी एकदाच मिळण्याच्या लालसेपाेटी मारून टाकत नाही. येथे साेन्याचे अंडे देणारी काेंबडी म्हणजे वितरक व त्यानंतर क्रमांक लागताे एक्झिबीटर्सचा (चित्रपटगृहमालक). त्यामुळे या व्यवसायात जाेपर्यंत वितरक व चित्रपटगृहमालक सुरक्षित अाणि समृद्ध हाेत राहतील, ताेपर्यंत चित्रपट व कलाकारांची मागणी कायम राहील. अक्षयकुमार हा स्मार्ट गुंतवणूकदारही अाहे. त्याने मुंबई व जवळपासच्या भागात त्याचा रिअल इस्टेट व्यावसायिक मित्र विकास अाेबेराॅयसाेबत या क्षेत्रात खूप गुंतवणूक केली अाहे. विकास अाेबेराॅय यांचे मुंबई उपनगरातील मालाड (पू.)मध्ये कार्यालय असून, अक्षय जुहूतून तेथे येत-जात राहताे. विकास यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे अाहे की, अक्षयला त्याच्या गंुतवणुकीतून वार्षिक ५० काेटी रुपयांपर्यंत कमाई हाेते. लाेखंडवालाच्या ३८ मजली इमारतीत त्याचे चार फ्लॅटस असून, प्रत्येक फ्लॅटची किंमत १५ ते २० काेटी अाहे. तसेच जुहूतील बंगल्याला अक्षय खूप लकी मानताे. अक्षयच्या संघर्षाच्या काळात याच बंगल्यात जयेश सेठ नावाच्या तेव्हाच्या एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने त्याचे फाेटाेशूट केले हाेते. त्यामुळे त्याने घरदेखील तेथेच घेतले. याशिवाय काही फ्लॅट्सही गुंतवणुकीच्या उद्देशाने घेतले.


मुंबईव्यतिरिक्त दुबई व कॅनडातील रिअल इस्टेट क्षेत्रातही त्याने गंुतवणूक केली अाहे. साेबतच वेगवेगळ्या नावाने त्याच्या चार चित्रपटनिर्मिती कंपन्याही असून, अाता तर त्याने मराठी चित्रपटनिर्मितीदेखील सुरू केली अाहे. एका मुलाखतीत अक्षय म्हणाला हाेता की, मी माझ्या अाजूबाजूच्या कलाकारांकडून शिकत राहिलाे. त्यांची गुणवैशिष्ट्ये तर अंगीकारलीच; परंतु त्यांच्या चुकांतूनही धडा घेतला. माझे सासरे राजेश खन्ना सुपरस्टार हाेते. नंतर काय झाले? त्यांचे पतन का झाले? हे सारे मी त्यांच्याकडून शिकलाे. त्याचप्रमाणे 'माेहब्बतें'पूर्वी कंपनीचे पतन झाल्याने निर्माण झालेल्या संकटातून त्यांनी स्वत:ला कसे बाहेर काढले, हे मी अमिताभ बच्चन यांच्याकडून शिकलाे. दुसरीकडे अक्षयकडे जाहिरातीदेखील माेठ्या संख्येत अाहेत. ताे सुमारे २० ब्रॅण्डच्या जाहिराती करताे. जाहिरात विश्वातील जाणकार त्याच्यातील एका वेगळ्या गुणाकडे लक्ष केंद्रित करतात. अक्षयकुमार हा चित्रपटांप्रमाणेच जाहिरातींतूनही देशभक्तीचा संदेश देत असताे. देशभक्तीच्या गाेष्टी व संदेश ही त्याची अलीकडे हाॅट प्राॅपर्टी बनली अाहे, असे त्यांनी सांगितले. अक्षयसाेबत अनेक चित्रपट बनवणाऱ्या प्रेरणा अराेरा सांगतात की, त्याचे वेळेचे व्यवस्थापन उत्कृष्ट असते. प्रत्येक चित्रपट सुमारे ३० ते ४० दिवसांत तयार झाला पाहिजे यादृष्टीनेच ताे नियाेजन करताे. त्यामुळेच वर्षातून तीन-चार चित्रपट करू शकताे. तसेच त्याची काम करण्याची पद्धतही इतरांहून वेगळी अाहे. ताे एकाच वेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरू करताे.

 

पहिल्या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण झाल्यानंतर त्याचे दुसरे शेड्यूल सुरू हाेण्यापूर्वी १२-१३ दिवसांचा गॅप घेताे. त्यादरम्यान पहिल्या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे संपादन पूर्ण हाेते. त्यानंतर ताे पहिल्या चित्रपटाचे दुसरे शेड्यूल सुरू करताे. मध्ये जाे गॅप घेताे त्या काळात दुसऱ्या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे काम सुरू करताे. काेमल नाहाटा सांगतात की, अक्षयला कामाचे अाऊटसाेर्सिंग करणेही खूप चांगले जमते. त्यामुळेच एक स्वतंत्र निर्माता म्हणून ताे चित्रपट बनवत अाहे. यासाेबतच धर्मा, वायकाॅम, इराॅस, यशराज यासारख्या काॅर्पाेरेट स्टुडिअाेंसाेबतही माेठे चित्रपट बनवून कमाई करत अाहे.अक्षयकुमारचे देशातील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी चांगले राजकीय संबंध अाहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनुदानाचा वा मध्य प्रदेशातील लाेकेशनच्या मिळणाऱ्या परवानगीचा विषय असाे, अक्षयच्या टीमला कसलीही अडचण येत नाही.

 

३ चित्रपटांची कमाई १०० काेटींहून जास्त
गतवर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षयच्या तीन चित्रपटांनी जगभरात १०० काेटींहून अधिकची कमाई केली हाेती. 'टाॅयलेट : एक प्रेमकथा'ने जगात एकूण २०९ काेटी कमावले. 'जाॅली एलएलबी-२'ने १८० काेटी व 'नाम शबाना'ने जगभरात ५७ काेटींची कमाई केली. 'नाम शबाना' हा पूर्णपणे त्याचा चित्रपट हाेता, असे मात्र म्हणता येणार नाही.

 

 

बातम्या आणखी आहेत...