आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई कमला मिल्स दुर्घटना: बारा दिवसांनंतर वन अबोव्ह पबच्या मालकांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीतील मुख्य आरोपी कृपेश आणि जिगर या दोन भावांना त्यांच्या वकिलांच्या घराबाहेर पकडले. - Divya Marathi
कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीतील मुख्य आरोपी कृपेश आणि जिगर या दोन भावांना त्यांच्या वकिलांच्या घराबाहेर पकडले.

मुंबई | तब्बल बारा दिवस गुंगारा दिल्यानंतर अखेर कमला मिल अग्निकांड प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. “वन अबोव्ह’ या पबचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजित मानकर या तिघांना बुधवारी रात्री उशिरा मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. भोईवाडा महानगर दंडाधिकाऱ्यांनी या तिघांना १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या तपासासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली होती तसेच या तिघांच्या ठावठिकाण्याची माहिती देणाऱ्यास तब्बल १ लाख रुपयांचे इनामही जाहीर केले होते.

 

या तिघांना आश्रय दिल्याप्रकरणी विशाल करिया या त्यांच्या मित्राला ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून क्रिपेश आणि जिगर हे दोघे बंधू आपल्या वकिलाला भेटण्यासाठी अंधेरी परिसरातील एका उपाहारगृहात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरा संघवी बंधूंना अटक केल्याची माहिती ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अहमद पठाण यांनी दिली. त्यानंतर संघवी बंधूंच्या चौकशीतून अभिजित मानकरचा ठावठिकाणा समजल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सकाळी त्याला मरिन लाइन्स परिसरातून अटक केली. या तिघांच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील एकूण ४ प्रमुख आरोपी अटकेत असून युग तुली या “मोजोस बिस्ट्रो’च्या मालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तुली आपल्या बायकोसोबत हैदराबाद विमानतळावर दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलिस पथक तिथे पोहोचण्यापूर्वीच तुलीने तिथून पोबारा केला होता.

 

मोजोस बारचा मालक अजूनही फरार-

- दरम्यान, वरील दोघांना आपल्या घरात आश्रय देणा-या आणखी एक हॉटेल मालक विशाल कारिया याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. 

- विशाल कारिया हा पब, रेस्टांरंटमध्ये काळा पैसा लावत असे. तो बुकी असून, अनेक क्रिकेटर्स यांच्यासह सेलिब्रेटिजसोबत त्याची ऊठबस आहे.
- विशाल कारियाच्या माहितीवरूनच मुंबई पोलिसांनी कृपेश संघवी, जिगर संघवीला अटक केली आहे.
- पोलिसांनी माहिती मिळाली की, संघवी बंधू वेस्ट लिकिंग रोडवर वांद्र्यात येत आहेत. 
- मग पोलिसांनी साध्या वेशात त्यांच्यावर पाळत ठेवली व त्यानंतर तासाभरात वकिलाच्या घराबाहेर त्यांना अटक केली.
- या तिघांवर 14 जणांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मोजोज रेस्टांरंटचा मालक युग तुली अजूनही फरार चालला आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज...

बातम्या आणखी आहेत...