आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंदुरी चिकन आणि सी-फूडसोबत मुंबईतील कपलचे प्री-वेडिंग फोटोशूट, फोटोज इंटरनेटवर व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विनीत मेहता आणि विशाखा प्रसादने असे केले प्री वेडिंग फोटोशूट... - Divya Marathi
विनीत मेहता आणि विशाखा प्रसादने असे केले प्री वेडिंग फोटोशूट...

मुंबई- प्री- वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड मागील काही वर्षापासून वाढत चालला आहे. लग्नाच्या आधी तरूण- तरूणी असे यूनिक फोटोज काढणे पसंत करत आहेत जे कायम आठवणीचा कप्पा राहील. यासाठी ते चांगल्या लोकेशनच्या शोधात असतात. यासाठीच एका कपल्सने फोटोशूटसाठी वेगळी आयडिया फॉलो केली आणि आपले फोटोशूटची थीम फूडशी संबंधित ठेवली. त्यांनी संपूर्ण शूट कॅफे, रेस्टांरंट्स आणि आउटडोर एरियाजमध्ये फूड्ससोबत शूट केले. यादिवशी होणार आहे दोघांचे लग्न...

 

- असे अनोखे फोटोशूट करणा-या कपलचे नाव विनीत मेहता (owner of Samsara Photography) आणि विशाखा प्रसाद आहे. 
- हे दोघे मुंबईत राहणारे आहेत. हे कपल 2016 पासून एकत्र आहे आणि 21 जानेवारीला गोव्यात विवाहबद्ध होत आहे.
- हे फोटोशूट Samsara Photography ने केले आहे ज्यात अनेक शानदार लोकेशन्स आणि  लाइटिंग्सचा वापर करत वेगवेगळ्या एंगल्समधून फोटो क्लिक केले आहेत.
- या शूटमध्ये त्या रेस्टांरंटला सुद्धा सामील केले आहे जेथे हे कपल पहिल्यांदा डेटवर गेले होते. तसेच त्या कॅफेचेही शूट केले आहे जेथे तो इतरांना भेटतात.
 
सोशल मीडियात झाले व्हायरल-

 

- विशाखाने सांगितले की, ही सर्व रेस्तरां आमच्या मनात घर करून राहिली आहेत.
- तिच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील लिट्टी चोखा, डोसा, गस्टोसोज पिज्जा, मुच्छड पान वाल्याकडील पान, डेव मोमोस, सी-फूड, महेश लंच होम आदी ठिकाणी शूट केले आहे. 
- या कपलचे हे फोटो शूट सोशल मीडियात खूपच व्हायरल होत आहे.
- Samsara Photography च्या माहितीनुसार, अशा वेगवेगळ्या आयडियाजनुसार फोटोशूट करून आम्ही कपल्सची मागणी पूर्ण करून प्री-वेडिंगचा कोलाज आठवणीचा ठेवा बनवतो.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, विनीत मेहता आणि विशाखा प्रसाद यांचे अनोखे प्री-वेडिंग फोटोशूट....

बातम्या आणखी आहेत...