आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांची नागपुरात संघाच्या नेत्यांशी चर्चा, पुढील घडामाेडींबाबत खल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात दाखल झालेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी संघ मुख्यालय गाठत यशाला हातभार लावल्याबद्दल त्यांचे आभार तर मानले. याशिवाय दोन्ही राज्यांतील सत्तेची स्थापना आणि नव्या सरकारच्या धोरणांबाबत सरसंघचालक व इतर नेत्यांशी चर्चाही केली.     


भाजपला त्रिपुरा आणि नागालँड या दोन राज्यांमध्ये कधी नव्हे ते यश मिळाले. या यशात संघ प्रचारकांचा वाटा मोठा मानला जातो. त्यामुळे निकाल येताच दुसऱ्याच दिवशी अमित शहा यांनी नागपुरात येऊन संघ मुख्यालय गाठले. संघ मुख्यालयातील तीन तासांच्या वास्तव्यात शहा यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर बड्या संघ नेत्यांचे आभार मानले. याशिवाय या दोन्ही राज्यांमधील सत्तेची समीकरणे, नव्या सरकारकडून राबवायची धोरणे अशा महत्त्वाच्या विषयांवर संघ नेत्यांनी शहा यांना बऱ्याच सूचना केल्याचे सांगितले जात आहे.

 

कर्नाटक निवडणुकीवरही या बैठकीच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. येत्या ९ मार्चपासून नागपुरात संघाची तीनदिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा भरणार आहे. या भेटीला त्या दृष्टीनेदेखील महत्त्व होते, असे सूत्रांनी सांगितले. अमित शहा सकाळी नागपुरात दाखल होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जोरदार स्वागत केले. विमानतळावरून शहा थेट गडकरी यांच्या रामनगरातील निवासस्थानी दाखल झाले. तेथे दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेचा तपशील स्पष्ट होऊ शकला नाही.

बातम्या आणखी आहेत...