आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अागीच्या दुर्घटना टाळण्यासाठी अमिताभ बच्चन करणार जनजागृती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या वर्षभरात मुंबईत अनेक अग्निकांडे हाेऊन काही जणांचे बळी गेले. या पार्श्वभूमीवर अागीच्या या घटना वाढू नयेत म्हणून बाॅलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे अग्निशामक दलाच्या साेबतीने राज्यभर जनजागृती करणार अाहेत.

 

या संदर्भात रविवारी साेशल मीडियावरून काही छायाचित्रे प्रसारित करून स्वत: बिग बी यांनी ही माहिती दिली. अाग लागू नये किंवा ती पसरू नये म्हणून काय उपाययाेजना कराव्यात याबाबत या जनजागृती अभियानातून माहिती देण्यात येणार अाहे. त्याचे सर्वसामान्य नागरिकांनी पालन करावे, अशी अपेक्षाही बच्चन यांनी व्यक्त केली. अमिताभ यांनी यापूर्वी हिपॅटायटिस सी, पाेलिअाे अादी सरकारी जनजागृती माेहिमेत स्वेच्छेने सहभाग घेतला हाेता.

बातम्या आणखी आहेत...