आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या नव्हे हत्या झाली या अॅंकरची, सेमी न्यूड स्थितीत मिळाली होती बॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इव्हेंट शोची अॅंकर होती अर्पिता. 5 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत होती अर्पिता.... - Divya Marathi
इव्हेंट शोची अॅंकर होती अर्पिता. 5 वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत होती अर्पिता....

मुंबई- 24 वर्षाच्या अॅंकर अर्पिता तिवारी हिच्या मृत्यूचे रहस्य 3 दिवसानंतर उलगडले आहे. पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच संशय होता की, एखादी तरूणी बाथरुममधील काचा तोडून फक्त अंडर गारमेंट्स घालून सुसाईड का करेल. या दरम्यान अर्पिताच्या कुटुंबियांनी आरोप केला होता की, तिचा बॉयफ्रेंड पंकज जाधव तिला मारहाण करायचा. अर्पिताची बहिण श्वेता तिवारीचे म्हणणे आहे की, अर्पिताने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली. परिस्थिती जन्य पुरावे पाहता पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. काय आहे अर्पिताची बहिण आणि मित्राचा आरोप...

 

- अर्पिताची बहिणीने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. तिचे म्हणणे आहे की, अर्पिता आणि तिचा बॉयफ्रेंड पंकज जाधव यांच्यात सर्व काही ठीक नव्हते. अर्पिता त्याच्यासोबतचे संबंध तोडू इच्छित होती. पंकज अनेकदा अर्पिताला मारहाण करायचा.
- श्वेताने सांगितले की, पंकज काहीही करत नसे तो अर्पिताच्या पैशावर ऐश करायचा. अर्पिताच्या मृत्यूच्या एक दिवस आधी वडिलांना फोन केला होता व मला सोन्यात गुंतवणूक करायची आहे अशी म्हणाली. याचाच अर्थ ती जीवनात पुढे जाऊ इच्छित होती. तसेच भविष्याबाबत ती विचार करत होती याचा अर्थ ती आत्महत्या करू शकत नाही.

- अर्पिताचा मित्र लकी शर्माच्या माहितीनुसार, हे कसे शक्य आहे की एका फ्लॅटमध्ये पाच लोक उपस्थित आहेत आणि त्यांना याची साधी भनक लागत नाही? अखेर पोलिस त्या लोकांकडे सक्त चौकशी का करत नाहीत. हा प्रकार आत्महत्येचा नव्हे हत्येचा आहे.
- त्या फ्लॅटमध्ये त्या रात्री तीनच गोष्टी घडू शकतात ते म्हणजे अर्पितासोबत जबरदस्ती झाली असावी, किंवा तिने स्वत:ला वाचविण्यासाठी वरून उडी मारली असावी किंवा तिला फेकून दिले असावे.

 

या स्थितीत मिळाली होती अर्पिताची बॉडी-

 

- मालवणी पोलिसांच्या माहितीनुसार, अर्पिता मीरा रोड भागात राहत होती. तसेच तिची बॉडी मानव तल बिल्डिंगमधील दुस-या मजल्यावरील टेरेसवर अंडर गारमेंट्समध्ये मिळाली होती.  
- ती सोमवारी आपल्या बॉयफ्रेंडसोबत मालवणीतील कच्चा रास्ता स्थित मानव तल बिल्डिंगमधील15 व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये गेली होती. तेथे एक पार्टी सुरू होती. 

 

पोलिसांना मित्रांनी सांगितली ही कहाणी- 

 

- अर्पिताच्या सहका-यांनी सांगितले की, पहाटे चारपर्यंत आमची पार्टी चालली त्यानंतर आम्ही झोपलो. मात्र, सकाळी उठलो तेव्हा अर्पिता फ्लॅटमधून गायब होती.  
- अर्पिता आपला मित्र पंकज जाधवसोबत मानवस्थल बिल्डिंगमध्ये आली होती. 15 व्या मजल्यावरील 1501 नंबरच्या फ्लॅटमध्ये पार्टी सुरू होती. पंकज आणि अर्पिता पहाटे चार वाजेपर्यंत पार्टी करत होते. सकाळी नऊ वाजता उठलो तेव्हा अर्पिता तेथे नव्हती.
- तिला शोधले असता समजले की, बाथरुमचा दरवाजा बंद आहे. जेव्हा दरवाजा तोडला तेव्हा तेथील काच तोडलेली दिसली. खाली येऊन पाहिले तर दुस-या मजल्यावर अर्पिताचा मृतदेह पडला होता.

 

शरीरावरील जखमामुळे वाढला संशय-

 

- अर्पिताच्या मृत्यूनंतर प्रिलिमनरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. रिपोर्टनुसार, तिच्यावर कोणतेही जबरदस्ती झालेली नाही. मात्र, मृत्यू मल्टीपल इन्जूरीमुळे झाल्याचे अहवाल सांगतो. 
- ही इन्जूरी कोणत्याही प्रकारची असू शकते. उडी मारल्याने किंवा तिला फेकून दिल्याने. अर्पिताच्या मानेवर आणि शरीराच्या अनेक भागावर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत.

 

पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अर्पिताचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...