आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Andheri Bridge: जखमींना एका लाखाची मदत, 15 दिवसांत येणार चौकशीचा अहवाल- पियुष गोयल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'अंधेरीतील गोखले पुल कोसळण्‍याची घटना दुर्दैवी असून याप्रकरणी रेल्‍वे आयुक्‍तांना चौकशीचे आदेश देण्‍यात आले आहेत. ते 15 दिवसांत अहवाल सादर करतील', अशी माहिती रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. 


जखमींना 1 लाख रुपयांची मदत 
या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही. मात्र पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना एक लाख रुपयांची मदत तसेच त्‍यांच्‍या उपचाराचा सर्व खर्च रेल्‍वेतर्फे करण्‍यात येणार असल्‍याची घोषणाही पियुष गोयल यांनी केली आहे. 

 

6 महिन्‍यांत मुंबईतील सर्व पुलांचे सेफ्टी ऑडीट करणार 
आपल्‍या ट्विटरवरून पियुष गोयल यांनी माहिती दिली आहे की, पुढील 6 महिन्‍यात मुंबई उपनगरातील सर्व 445 रोड ओव्‍हर ब्रिज व फुट ओव्‍हर ब्रिज यांचे सेफ्टी ऑडीट करण्‍यात येईल. रेल्‍वे आयआयटीच्‍या नेतृत्‍वाखाली बीएमसी आणि रेल्‍वे दोघे मिळून हे ऑडीट करतील. यादरम्‍यान एखाद्या पुलात दोष आढळला तर तातडीने त्‍यामध्‍ये दुरूस्‍ती केली जाईल.  


मोटरमन चंद्रशेखर सावंत यांना 5 लाखाचे बक्षिस 
बोरिवलीवरून चर्चगेटला जाणा-या रेल्‍वेचे मोटरमन चंद्रशेखन सावंत यांनी इमर्जन्‍सी ब्रेक मारल्‍याने मोठा अनर्थ टळला. हा पूल पडला त्‍याचा काही अंतरावरच असताना सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबल्‍याने अनेकांचे प्राण वाचले. याबद्दल कौतूक करत पियुष गोयल यांनी चंद्रशेखर यांना 5 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. 


मुंबई उपनगर रेल्‍वेसाठी 65 हजार कोटी रुपये 
मुंबई उपनगर रेल्‍वेसाठी 65 हजार कोटी रुपये खर्च करण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाने घेतल्‍याची माहितीही पियुष गोयल यांनी दिली आहे. या निधीद्वारे रेल्‍वे प्रवाशांना सुविधा पुरविण्‍यात येतील, असे त्‍यांनी सांगितले आहे. 

 

5 जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर 

अंधेरी आणि विलेपार्लेला जोडणारा गोखले पुल आज  7 वाजून 40 मिनिटांनी कोसळला. ब्रिज आणि लोखंडाचा सपोर्ट ओव्हरहेड वायरवर कोसळल्यामुळे ओव्हरहेड वायर तुटल्या आहेत. या दुर्घटनेत दोन पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, रेल्‍वे मंत्री पियुष गोयल यांच्‍या कार्यालयाने केलेले ट्विट्स... 

 

 

बातम्या आणखी आहेत...