आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अण्णा हजारेंच्या दिल्लीतील अांदाेलनाच्या अायाेजनात भ्रष्टाचाराचाच पैसा गुंतला आहे. हा पैसा तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी दिला अाणि अांदाेलनाच्या काेअर टीममध्ये सहभाग मिळवला, असा गाैप्यस्फाेट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्याचबराेबर भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावरील भाेसरीच्या जमिनीच्या संदर्भातील अाराेपाचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
त्या म्हणाल्या, इनामदार काही वर्षांपूर्वी भुजबळांकडे काम करायच्या. भुजबळांच्या प्रकरणातून बाजूला होण्यासाठी हवे ते देण्याचा प्रस्ताव घेऊन २ डिसेंबर २०१४ राेजी माझ्याकडे आल्या. मी त्यांना हाकलून दिले. तत्पूर्वी इनामदारांनी झाेपडपट्टी पुनर्वसन कामात व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांच्याबराेबर काम केल्याचे सांगितले. अशा महिलेला अण्णांच्या अांदाेलनात बघून मला धक्का बसला. मी अण्णांना सांगितले. त्यावर अण्णांनी यापुढे त्यांना अांदाेलनापासून दूर ठेवू, असे सांगितले.
दरम्यान, अांदाेलनाला २२ लाख ५० हजार रुपये खर्च आला. कर्नाटक, दिल्लीतील व्यक्तींनी व इनामदार यांनी हा खर्च केल्याचे समजते. त्यामुळे इनामदारांकडे पैसा अाला कुठून व खडसेंशी कनेक्शन नेमके कशा प्रकारचे अाहे, याच्या चाैकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.