आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांबळीच्या पत्नीकडून चपलेने मारण्याची धमकी : अंकुर तिवारी; दोघांची परस्परविरोधात तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मालाड येथील इनअाॅर्बिट माॅलमध्ये गायक अंकित तिवारी यांच्या वडिलांनी अापल्या पत्नीबराेबर असभ्य वर्तन केल्याची तक्रार  माजी क्रिकेटपटू विनाेद कांबळी याने मालाड येथील पाेलिस ठाण्यात केली अाहे,  तर अंकित तिवारी याचा भाऊ अंकुर तिवारी यानेही हे अाराेप फेटाळून लावत कांबळी कुटुंबाविराेधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली अाहे. विनाेद कांबळी अाणि त्याची पत्नी अॅंड्रिया हे रविवारी दुपारी इनअाॅर्बिट माॅलमध्ये खरेदीसाठी गेले हाेते. या वेळी अंकुर तिवारी, त्याचे वडील, पत्नी अाणि मुले हे कुटुंबासह याच माॅलमध्ये अाले हाेते. त्या वेळी अंकुर तिवारी यांच्या वडिलांचा धक्का कांबळी यांच्या पत्नीला लागला. सुरुवातीला हा प्रकार अनवधानाने हाेत असल्याचे कांबळी याची पत्नी अॅंड्रियाला वाटले. मात्र, काही वेळाने हा प्रकार जाणूनबुजून हाेत असल्याचे तिच्या लक्षात अाले. त्यानंतर अॅंड्रियाने अंकुरच्या वडिलांना धक्का मारला व त्यानंतर अाम्ही त्या ठिकाणाहून निघून गेलाे, असे विनाेद कांबळीने  तक्रारीत म्हटले.  

 
कांबळीच्या पत्नीकडून चपलेने मारण्याची धमकी : अंकुर तिवारी  
अंकुर तिवारी म्हणाल, माझे वडील निवृत्त बँक कर्मचारी अाहेत. ते माझ्या मुलीला घेऊन गेम झाेनमध्ये गेले हाेते. त्या वेळी कांबळी व एका महिलेने धक्काबुक्की केल्याचे अापणास सांगितले. त्यानंतर कांबळीला जाब विचारताच त्याने मलादेखील धक्काबुक्की तसेच कांबळीच्या पत्नीने चपलेने मारण्याची धमकी दिल्याचा अाराेप केल्याचे तिवारी याने  म्हटले आहे.


काय म्हणाला कांबळी..
कांबळीने याबाबत बोलताना सांगितले की, एका वयस्कर व्यक्तीने माझ्या पत्नीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यावर माझ्या पत्नीने त्याचा हाच धरला आणि त्याला धक्का दिला. त्यावेळी आम्ही गेम झोनजवळ होतो. त्याठिकाणी काही बोलाबोली झाली. त्यानंतर आम्ही फूड कोर्टमध्ये होतो तेव्हा तो व्यक्ती दुसऱ्या एकाजणासह त्याठिकाणी आला. तो कदाचित त्यांचा मुलगा असावा. त्यांनी अँड्रियावर अचानक हल्ला केला. मी त्यांना विरोध केला त्यावर आम्ही कोण आहोत, तुला माहिती नाही, अशा धमक्या दिल्याचे विनोदने सांगितले. तिवारी गर्दीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते असे अँड्रिया म्हणाली. 


काय म्हणाला अंकुर..
अंकितचा भाऊ अंकुरने सांगितले की, मी माझी पत्नी आणि मुलीसह वडिलांना घेऊन गेलो होतो. माझे वडील मुलीबरोबर गेमझोनमध्ये गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. वडिलांना याबाबत धक्का बसला होता. त्यांच्यावर असा आरोप झाल्याने ते गोंधळले होते. त्यामुळे मी बोलण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. पण त्यांनी मलाही धक्का दिला आणि कांबळीच्या पत्नीने आमच्यावर सँडल उगारले. 

 

बातम्या आणखी आहेत...