आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिडेंच्या अटकेसाठी तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्‍यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचारप्रकरणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी मंत्रालयासमोर एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गणेश पवार असे या तरुणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या गावाचा   रहिवाशी आहे.  


कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत गणेश दुपारी एक वाजेच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आला. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्याने घोषणा देत त्याने अंगावर राॅकेल ओतून घेतले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघितला आणि त्यांनी तातडीने धावाधाव करत गणेशला लागलीच ताब्यात घेतले. मंत्रालयात दुपारी दोननंतर आंगतुकांना आत येण्यासाठी प्रवेशपत्रे दिली जातात. प्रवेशपत्र काढण्यासाठी या ठिकाणी मोठी रांग लागलेली असताना हा प्रकार घडला. दरम्यान, आत्मदहनासाठी तरुणाने उचलेल्या पावलानंतर या ठिकाणी थोडा गोंधळ झाला. गोंधळानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली होती. गणेश पवार हा आनंदराज आंबेडकर अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.   


कोरेगाव भीमा येथे यंदा १ जानेवारी रोजी दोन गटांत झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती. दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मिलिंद एकबोटे यांना अटक झाली होती. त्यांना जामीनही मिळाला आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजी यांना अद्याप अटक झालेली नाही.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, एकबोटेप्रमाणे भिडेंनाही अटक करा : आठवले....

बातम्या आणखी आहेत...