आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्का नव्हे ही तिची डुप्लीकेट, 15 व्या वर्षी मिळवली प्रसिद्धी तर पस्तिशीतच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवुड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हे दोघे सोमवारी (11 डिसेंबर) लग्नाच्या बेडीत अडकले. इटलीच्या टस्कनी प्रांतातील बोरगो फिनोसिएतो रिसॉर्टमध्ये विराटने अनुष्कासोबत सप्तपदी घेतली.

 

अनुष्का-विराटच्या विवाहाच्या वृत्ताने मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोर धरला होता. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी पाकिस्तानी सिंगरची माहिती घेऊन आलो आहे. ही सिंगर हुबेहूब अनुष्का शर्मा सारखीच दिसत होती.

 

पाकिस्तानात राहाणारी नाजिया ही कामानिमित्त कायम मुंबईत येत होती. नाजियाने अवघ्या 15 व्या वर्षी मोठी प्रसिद्धी मिळवली होती. तिने फिल्मफेअर अवॉर्ड पटकावला होता. परंतु वयाच्या पस्तिशीतच कॅन्सरने तिचा मृत्यू झाला होता.

 

पहिला अल्बम सुपरहीट...
- नाजिया हसन हिने वयाच्या 10 वर्षीच करिअरला सुरुवात केली होती.
- तिचा पहिला अल्बम 'डिस्को दीवाने' 1981 मध्ये रिलीज झाला होता.

 

5 वर्षे नाजियाने दिली मृत्यूशी झुंज...

1980 मध्याे आलेला सिनेमा 'कुर्बानी'मधील 'आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए..' हे गीत नाजिया हसन हिने गायिले होते. पेशाने सिंगर, लॉयर आणि सोशल अॅक्टिव्हिस्ट राहिलेली नाजियाने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले होते. वयाच्या तिशीत तिला कॅन्सर जडला. तिने 5 वर्षे मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर ती अयशस्वी ठरली.

 

मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी पतीने दिला होता तलाक...
- 30 मार्च 1995 रोजी नाजियाने बिझनेसमन मिर्झा इश्तियाक वेग यांच्यासोबत कराचीमध्ये निकाह केला होताे. दोन वर्षात या दाम्पत्याला अर्ज हसन नामक मुलगा झाला. कर्करोगाने तिचे 13 ऑगस्ट, 2000 रोजी लंडनमध्ये निधन झाले. मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी पतीने त‍िला तलाक दिला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.... हुबेहूब अनुष्‍कासारखी दिसणारी नाजिया हसनचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...