आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी २४ जुलैपूर्वी अर्ज करा: कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  राज्यात खरिपाच्या हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येणार अाहे. तरी शेतकऱ्यांनी २४ जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी केले. या योजनेंतर्गत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार असून ही योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक, तर बिगर कर्जदार         शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेंतर्गत १५ पिके अधिसूचित करण्यात आली असून त्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, कारळे, कापूस व खरीप कांदा अशा पिकांचा समावेश आहे. कर्जदार शेतकऱ्यांकरिता विमा प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी २४ जुलै आहे.   

 
महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुका या स्तरावर ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३४ जिल्ह्यांसाठी विमा कंपन्या नियुक्त करण्यात आल्या असून यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, बीड, सांगली, नाशिक, रायगड या जिल्ह्यांकरिता ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, जालना, वाशीम, नागपूर, गडचिरोली, पालघर यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, नांदेड, हिंगोली, वर्धा, ठाणे या जिल्ह्यांकरिता इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, उस्मानाबाद, जळगाव, सोलापूर, सातारा यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी, परभणी, अमरावती, भंडारा, पुणे यासाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, नंदुरबार याकरिता आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. लातूर, अहमदनगर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता विमा कंपनी नियुक्तीचा शासन निर्णय काढण्यात येणार आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...