आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे न दिल्याने इंटिरियर डिझायनरची आत्महत्या, अर्णव गोस्वामीविरोधात अलिबागमध्ये गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी यांनी कामाचे पैसे न दिल्याने निराश झालेल्या इंटिरियर डिझायरनने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी अर्णव आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इंटिरियर डिझायनरच्या 73 वर्षांच्या आईचाही मृतदेह घरात आढळल्याने तर्कवितर्क सुरु झाले आहेत. 

 

इंटिरियर डिझायनर अन्‍वय नाईक (52) मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने  अंआणि सजावटीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी ते आलिबागमधील कावीर येथील आपल्या घरी आले होते. शनिवारी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली, त्यात अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट  स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे. अन्वय यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरुन तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी गुन्हा नोदविला असून पुढील तपास सुरु केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...