आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता अश्विनी बिद्रेची हत्या? पीआय अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेपत्ता अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा संशय आहे. - Divya Marathi
बेपत्ता अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा संशय आहे.

मुंबई- कोल्हापूरातील बेपत्ता सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हिची हत्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याने अश्विनी ब्रिदेसोबत घातपात केला असावा अशी माहिती खुद्द पोलिसांनीच कोर्टात दिली आहे. दरम्यान, पोलिसांना ब्रिदे बेपत्ता प्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.

 

एप्रिल 2016 पासून अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता आहेत. मात्र, पोलिस चौकशीत आढळून आले आहे की, अश्विनी बेपत्ता झाल्यानंतर अभय कुरूंदकरच्या भाईंदर येथील घराचा रंग बदलला गेला. सोबतच भिंतीवर काही रक्ताचे डाग व घरात महिलेचे केसही आढळून आले आहेत. त्याच काळात कुरुंदकरने घराची स्वच्छता करून घेतली. कुरूंदकरने त्याच काळात रंग का बदलला, त्या घरात काही अनपेक्षित घटना घडली आहे का? याचा तपास पोलिस करत आहे.

 

रंग कोणत्या दुकानातून आणला, घराच्या रंगरंगोटीचे काम कोणी केली आदींचा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांना तपासकामी अभय कुरूंदकर कोणतेही सहकार्य करत नाहीये. पोलिस दलातच असल्याने त्याला सर्व ट्रिक माहित आहेत. तो सर्व प्रश्नांची उत्तरे 'नाही' अशी व त्रोटक स्वरूपात देत आहे, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात माहिती सादर केली. यानंतर त्याला आणखी सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

बेपत्ता होण्यापूर्वी अश्विनी हिने आपल्याला विपश्यनेसाठी जाणार असल्याचे सांगितल्याचे अभय कुरूंदकरने तपासादरम्यान सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी एक पथक महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली व हिमालयातील अनेक विपश्‍याना केंद्रात पाठवले आहे. मात्र आश्‍विनी बिद्रे यांचा कुठेही ठावठिकाणा लागत नसल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी म्हटले आहे.  

 

महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानेच कुरूंदकरला अटक-

 

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात कुरुंदकराचा सहभाग आहे हे अश्विनीचे पती, वडिल व भाऊ हे वारंवार सांगत होते. याबाबत त्यांनी पोलिसांत रीतसर तक्रारी दिल्या आहेत. मात्र, पोलिसांनी आजपर्यंत या प्रकरणाची दखल घेतली नव्हती. अखेर या प्रकरणात अश्विनी यांनी कुरूंदकर आणि त्यांच्यात झालेले संभाषण मोबाईल व संगणकात सेव्ह करून ठेवलेल्या बाबी कुटुंबियांच्या हाती लागल्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्यामागे कुरूंदकर यांचाच हात असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांचे संभाषण व व्हिडिओ आधी सोशल मिडियात व नंतर मेन स्ट्रीम माध्यमांत येताच पोलिसांवर दवाब वाढला. सोबत नातेवाईकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

 

यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची तीव्रता पाहता योग्य कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिका-यांना दिले. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली व तपासकामाला वेग आला. आता अश्विनी बेपत्ता प्रकरणी कुरुंदकराच्या विरोधात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अश्विनी यांची हत्या झाली असावी व या घातपातामागे अभय कुरूंदकर हाच असावा अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्याचमुळे कोर्टाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील आठवडाभर या प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज व माहिती...

बातम्या आणखी आहेत...