आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्यावर खुनी हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रा. सुषमा अंधारे - Divya Marathi
प्रा. सुषमा अंधारे

मुंबई- फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या प्रा. सुषमा अंधारे यांच्यावर मध्यप्रदेशमधील इंदूर येथे गुरूवारी रात्री हल्ला करण्यात आवा. इंदूरपासून 15-20 किलोमीटर अंतरावर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अंधारे जखमी झाल्या असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

 

याबाबतची माहिती अशी की, सुषमा अंधारे सध्या एका कार्यक्रमानिमित्त इंदूर येथे गेल्या आहेत. गुरूवारी रात्री एका कार्यक्रमातून परतत असताना एका गाडीने त्यांच्या गाडीला धडक दिली. ज्या गाडीने धडक दिली त्याला नंबरप्लेट नव्हती. हल्लेखोरांनी अंधारे यांच्या कारला मुद्दामहून तीन वेळा जोरदार धडक दिली. यात अंधारे यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला आहे. सध्या सुषमा यांची प्रकृती स्थिर असून, इंदूरमध्ये उपचार सुरू आहेत. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. इंदूर पोलिस पुढील तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...